Olympic 2024 Neeta Ambani Becomes IOC Member: रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर (IOC) दुसऱ्यांदा एकमताने निवड झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या (Olympic 2024) उद्घाटन समारंभाच्या काही दिवस आधी बुधवारी ही घोषणा करण्यात आली. या प्रक्रियेसाठी एकूण ९३ मते पडली आणि सर्व मते नीता अंबानी यांच्या बाजूने होती. नीता अंबानी, २०१६ मध्ये IOC मध्ये सामील होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. नीता अंबानी यांनी त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल तिच्यावर ठेवलेल्या कृतज्ञता व्यक्त केली.

हेही वाचा – Olympic 2024: हॉटस्टार, फॅनकोड नाही तर… भारतात ‘या’ अ‍ॅपवर फ्री पाहता येणार ऑलिम्पिकचे लाईव्ह सामने, जाणून घ्या सविस्तर

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Gondia, EVM , Ballot Paper, CPI, BRSP,
गोंदिया : ‘ईव्हीएम हटवा, बॅलेट पेपर आणा’; भाकप, ‘बीआरएसपी’ आक्रमक
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?

नीता अंबानी म्हणाल्या, ‘आयओसीच्या सदस्य म्हणून पुन्हा निवडून आल्याने मला खूप सन्मान मिळाल्यासारखे वाटत आहे. मी अध्यक्ष बाख आणि IOC मधील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छिते. ही फेरनिवडणूक हा केवळ वैयक्तिक मैलाचा दगड नसून जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताच्या वाढत्या प्रभावाची ओळख आहे. नीता अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनने भारतीय क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

नीता अंबानी दुसऱ्यांदा झाल्या IOC सदस्य

पुढे नीता अंबानी म्हणाल्या, “मी हा आनंद आणि अभिमानाचा क्षण प्रत्येक भारतीयासोबत शेअर करते आणि भारत आणि जगभरातील ऑलिम्पिक चळवळीला बळकट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू ठेवण्यास उत्सुक आहे. नीता अंबानींनी त्यांच्या पहिल्या नियुक्तीपासूनच भारताच्या ऑलिम्पिकला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या उपक्रमांद्वारे देशातील खेळांच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी अंबानी आणि समितीच्या इतर पुनर्नियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा – Paris 2024 Olympics Schedule: भारताचं संपूर्ण वेळापत्रक, तारीख वेळेसहित कधी होणार हॉकी आणि बॅडमिंटनसहित सर्व खेळांचे सामने?

नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली भारताला ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या वार्षिक बैठकीचे आयोजन करण्याची संधी मिळाली. गेल्या वर्षी मुंबईतील अंबानी कुटुंबाच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंसाठी इंडिया हाऊस बांधण्यात आले आहे. हे इंडिया हाऊस भारतीय खेळाडू, समर्थक आणि प्रेक्षकांसाठी बांधण्यात आले आहे.

हेही वाचा – Paris Olympic 2024 च्या पदकांचं आयफेल टॉवरशी खास कनेक्शन, ‘अशी’ तयार केली यंदाची पदकं

रिलायन्स फाऊंडेशन ॲथलिट स्कॉलरशिप प्रोग्रामच्या मदतीने अनेक गरजू खेळाडूंना मदत करत आहे. या कार्यक्रमांतर्गत ते खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा आणि प्रशिक्षकांचा खर्च तर करतात, शिवाय त्यांना प्रशिक्षणासाठी परदेशातही पाठवण्याची व्यवस्था आहे. या कार्यक्रमासाठी टोकियो कांस्यपदक विजेता निखत जरीन, आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेते किशोर जेना आणि ज्योती याराजी आणि टेबल टेनिस स्टार मनिका बत्रा यांना रिलायन्सच्या या पोग्राममधून मदत मिळाली आहे.

Story img Loader