Paralympics Games 2024 Nitesh kumar Won Gold in Badminton: भारताच्या नितेश कुमारने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. नितीश कुमारने पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन SL3 स्पर्धेच्या अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा २१-१४, १८-२१, २३-२१ असा पराभव केला. तीन वर्षांपूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या प्रमोद भगतने याच स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. यावेळी नितेशकुमारने हे विजेतेपद पटकावले. नितीश कुमार यापूर्वी कधीही डॅनियल बेथेलचा पराभव केला नव्हता.
नितीश कुमारने बॅडमिंटनच्या एकेरी SL3 फायनलमध्ये ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे. नितीशकुमारने पहिल्या सेटमध्ये दमदार कामगिरी केली. त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला टिकून राहण्याची फार संधी दिली नाही. भारतीय खेळाडू नितीश कुमार विरुद्ध डॅनियल बेथेल फ्लॉप ठरला. नितीशने उत्कृष्ट कामगिरी करत थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली. सुरुवातीपासूनच त्याने आघाडी कायम ठेवली आहे. याच कारणामुळे त्याने हा सेट २१-१४ असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसत होती. या सेटमध्ये ग्रेट ब्रिटनचा डॅनियल बेथेल खूपच आक्रमक दिसत होता. या सेटमध्ये नितेश थोडा मागे राहिला. शेवटी, बेथेलने हा सेट २१-१८ असा जिंकला. दुसरा सेट जिंकताच त्याने सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये नितीशकुमारने पुनरागमन करत हा सेट २३-२१ असा जिंकला. सेट जिंकण्याबरोबरच त्याने सुवर्णपदकही पटकावले. सुवर्णपदक पटकावल्यानंतर नितेशने जोरदार सेलिब्रेशन केलं आणि प्रशिक्षकांची भेट घेतली. त्यानंतर त्याने जर्सी काढून सौरव गांगुली स्टाईल सेलिब्रेशन केलं.
या पदकासह पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताच्या पदकांची संख्या ९ झाली आहे. यामध्ये २ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. पॅरिस पॅरालिम्पिक गेम्सच्या पदकतालिकेत भारत आत्तापर्यंत २२ व्या स्थानावर पोहोचला आहे (२ सप्टेंबर २०२४, संध्याकाळी ५:१० पर्यंत).
हरियाणातील चरखी दादरी येथील पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमारने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून देत मोठी कामगिरी केली आहे. SL3 वर्गातील खेळाडू, नितेश सारखे, कंबरेखालच्या अवयवांच्या अपंगत्वांसह किंवा गंभीर गंभीर आजार असलेल्या स्पर्धकांसह स्पर्धा करतात. २९ वर्षीय नितेशने २००९ च्या अपघातात त्याने त्याचा पाय गमावला होता, पण यातून वर येत त्याने देशासाठी पदक पटकावले आहे. आयआयटी मंडीमधून पदवीधर असलेल्या नितेशने टोकियो पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता SL3 श्रेणीतून बाहेर पडल्यानंतर या श्रेणीत भारतासाठी पदक मिळवायचे याची खात्री बाळगली.