Nitish Kumar Reddy Instagram Story After Century:नितीश कुमार रेड्डीने मेलबर्न कसोटीच्या तिसऱ्या दिवशी उत्कृष्ट कामगिरी करत आपले पहिले कसोटी शतक झळकावले. नितीश रेड्डीच्या या शतकाचे चाहत्यांपासून ते माजी दिग्गज क्रिकेटपटूंपर्यंत सर्वच जण कौतुक करत आहेत. नितीश रेड्डीचे वडिल आणि त्याच्या कुटुंबाला त्याची कामगिरी पाहून अश्रू अनावर झाले. फक्त त्याचे कुटुंबीय नाही तर माजी क्रिकेटपटूंच्या डोळ्यातही अश्रू होते. पण आता शतकी खेळीनंतर नितीशने इन्स्टाग्रामवर दोन स्टोरी शेअर केल्या आहेत.

नितीश रेड्डीने त्याच्या शतकानंतर त्याच्या वडिलांसाठी आणि मोहम्मद सिराजसाठी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत कॅप्शनही दिलं आहे. नितीश रेड्डीच्या वडिलांनी नितीशच्या क्रिकेटसाठी आपली नोकरी सोडली होती आणि त्याला चांगला क्रिकेटपटू म्हणून घडवण्यासाठी खूप कष्ट घेतले. नितीश शतकाजवळ येताच त्याच्या प्रत्येक धावेवर त्याचे वडिल हात जोडून प्रार्थना करत होते. त्याचे शतक होताच वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले आणि त्यांनी देवाचे आभार मानले. नितीश रेड्डीने वडिलांच्या डोळ्यात अश्रू असलेला आणि त्याच्या शतकाचा एक फोटो असा कोलाज असलेली एक पोस्ट शेअर करत हे शतक तुमच्यासाठी आहे असं त्याने कॅप्शन दिलं आहे.

urmila kothare car accident video
अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडलं, एकाचा मृत्यू; घटनास्थळावरील व्हिडीओ आला समोर
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
Nitish Reddy Family Emotional Moment Mother Sister Father Reacted on his Maiden Test Century IND vs AUS
VIDEO: नितीश रेड्डीचं कुटुंब झालं भावुक! आई आणि बहिणीच्या डोळ्यातही आनंदाश्रू; शतकाबाबत म्हणाले, “सर्वात मोठं गिफ्ट…”
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली नाही’, डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस्थळाच्या मागणीवर प्रणव मुखर्जींच्या लेकीचा संताप
Suresh Dhas Karuna Dhananjay Munde
Suresh Dhas: बीड जिल्ह्याची करुण कहाणी सांगताना सुरेश धसांकडून करुणा मुंडेंचा उल्लेख; म्हणाले, “तिची तर…”
Nitish Reddy Family Meets Him in Team Hotel After Maiden Test Hundred BCCI Shares Video
IND vs AUS: लेकाच्या कुशीत रडला ‘बापमाणूस’, नितीश रेड्डीला शतकानंतर हॉटेलमध्ये भेटले कुटुंबीय; BCCIने शेअर केला VIDEO
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हेही वाचा – IND vs AUS: “मी टेन्शनमध्ये होतो, पण सिराजने…”, नितीश रेड्डीच्या वडिलांची लेकाच्या शतकावर पहिली प्रतिक्रिया, सिराजचा उल्लेख करत काय म्हणाले?

Nitish Kumar Reddy Instagram Story for Father
नितीश कुमार रेड्डीची इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा – IND vs AUS: नितीश रेड्डीचं पहिलं कसोटी शतक! ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर एकटा उभा ठाकला; वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू

नितीश रेड्डीच्या शतकासह त्याला ३ महत्त्वाचे चेंडू खेळून साथ देणाऱ्या मोहम्मद सिराजचही तितकंच कौतुक केलं जात आहे. मोहम्मद सिराजचाही नितीश रेड्डीच्या शतकात खारीचा वाटा आहे. नितीश रेड्डी ९९ धावांवर खेळत असताना कमिन्सच्या षटकात भारताने ९वी विकेट गमावली. बुमराह ३ चेंडू खेळाडू कमिन्सच्या षटकात झेलबाद झाला. यानंतर मोहम्मद सिराज फलंदाजीसाठी येणार होता, आता मोठी पेचाची स्थिती होती, भारताच्या हातात विकेट होती, नितीशला शतकासाठी एका धावेची गरज होती आणि सिराजवर सर्व जबाबदारी होती. कमिन्सच्या षटकातील चेंडू खेळून नितीशला स्ट्राईक देणं किंवा ते षटक खेळून काढणं….

हेही वाचा – VIDEO: नितीश रेड्डीचं कुटुंब झालं भावुक! आई आणि बहिणीच्या डोळ्यातही आनंदाश्रू; शतकाबाबत म्हणाले, “सर्वात मोठं गिफ्ट…”

मोहम्मद सिराजने मोठ्या कमालीची बचावात्मक फलंदाजी करत कमिन्सच्या षटकातील ३ चेंडू खेळून काढले आणि पुढच्या षटकात नितीशला स्ट्राईक मिळाली. नितीशने एक चेंडू डॉट खेळला आणि त्यानंतर त्याने चौकारासह शतक पूर्ण केले. सिराजने ३ चेंडू खेळून काढत विकेट वाचवली आणि नितीशला शतक पूर्ण करण्याची संधी दिली. यासाठी नितीशने सिराजला शतक पूर्ण झाल्यानंतर मिठी मारल्याचा एक फोटो शेअर करत ‘I Also Believe in Siraj Bhai’ असं म्हणत त्याला टॅग केलं आहे.

हेही वाचा – ZIM vs AFG: तीन खेळाडूंची शतकं आणि धावांचा डोंगर! झिम्बाब्वे संघाने घडवला इतिहास, कसोटीमध्ये उभारली सर्वात मोठी धावसंख्या

Nitish Kumar Reddy Instagram Story for Father
नितीश कुमार रेड्डीची इन्स्टाग्राम स्टोरी

संघाला जेव्हा विकेट्सची गरज असते तेव्हा तेव्हा बुमराह पुढे येऊन संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतो त्यामुळे बुमराहसाठी हल्ली हे वाक्य वापरलं जात, We Believe in Jassi Bhai. आता नितीशने हेच वाक्य सिराजसाठी वापरत स्टोरी शेअर केली आहे.

Story img Loader