Nitish Kumar Reddy Instagram Story After Century:नितीश कुमार रेड्डीने मेलबर्न कसोटीच्या तिसऱ्या दिवशी उत्कृष्ट कामगिरी करत आपले पहिले कसोटी शतक झळकावले. नितीश रेड्डीच्या या शतकाचे चाहत्यांपासून ते माजी दिग्गज क्रिकेटपटूंपर्यंत सर्वच जण कौतुक करत आहेत. नितीश रेड्डीचे वडिल आणि त्याच्या कुटुंबाला त्याची कामगिरी पाहून अश्रू अनावर झाले. फक्त त्याचे कुटुंबीय नाही तर माजी क्रिकेटपटूंच्या डोळ्यातही अश्रू होते. पण आता शतकी खेळीनंतर नितीशने इन्स्टाग्रामवर दोन स्टोरी शेअर केल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नितीश रेड्डीने त्याच्या शतकानंतर त्याच्या वडिलांसाठी आणि मोहम्मद सिराजसाठी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत कॅप्शनही दिलं आहे. नितीश रेड्डीच्या वडिलांनी नितीशच्या क्रिकेटसाठी आपली नोकरी सोडली होती आणि त्याला चांगला क्रिकेटपटू म्हणून घडवण्यासाठी खूप कष्ट घेतले. नितीश शतकाजवळ येताच त्याच्या प्रत्येक धावेवर त्याचे वडिल हात जोडून प्रार्थना करत होते. त्याचे शतक होताच वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले आणि त्यांनी देवाचे आभार मानले. नितीश रेड्डीने वडिलांच्या डोळ्यात अश्रू असलेला आणि त्याच्या शतकाचा एक फोटो असा कोलाज असलेली एक पोस्ट शेअर करत हे शतक तुमच्यासाठी आहे असं त्याने कॅप्शन दिलं आहे.
नितीश रेड्डीच्या शतकासह त्याला ३ महत्त्वाचे चेंडू खेळून साथ देणाऱ्या मोहम्मद सिराजचही तितकंच कौतुक केलं जात आहे. मोहम्मद सिराजचाही नितीश रेड्डीच्या शतकात खारीचा वाटा आहे. नितीश रेड्डी ९९ धावांवर खेळत असताना कमिन्सच्या षटकात भारताने ९वी विकेट गमावली. बुमराह ३ चेंडू खेळाडू कमिन्सच्या षटकात झेलबाद झाला. यानंतर मोहम्मद सिराज फलंदाजीसाठी येणार होता, आता मोठी पेचाची स्थिती होती, भारताच्या हातात विकेट होती, नितीशला शतकासाठी एका धावेची गरज होती आणि सिराजवर सर्व जबाबदारी होती. कमिन्सच्या षटकातील चेंडू खेळून नितीशला स्ट्राईक देणं किंवा ते षटक खेळून काढणं….
मोहम्मद सिराजने मोठ्या कमालीची बचावात्मक फलंदाजी करत कमिन्सच्या षटकातील ३ चेंडू खेळून काढले आणि पुढच्या षटकात नितीशला स्ट्राईक मिळाली. नितीशने एक चेंडू डॉट खेळला आणि त्यानंतर त्याने चौकारासह शतक पूर्ण केले. सिराजने ३ चेंडू खेळून काढत विकेट वाचवली आणि नितीशला शतक पूर्ण करण्याची संधी दिली. यासाठी नितीशने सिराजला शतक पूर्ण झाल्यानंतर मिठी मारल्याचा एक फोटो शेअर करत ‘I Also Believe in Siraj Bhai’ असं म्हणत त्याला टॅग केलं आहे.
संघाला जेव्हा विकेट्सची गरज असते तेव्हा तेव्हा बुमराह पुढे येऊन संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतो त्यामुळे बुमराहसाठी हल्ली हे वाक्य वापरलं जात, We Believe in Jassi Bhai. आता नितीशने हेच वाक्य सिराजसाठी वापरत स्टोरी शेअर केली आहे.