SMAT 2024 Nitish Rana Ayush Badoni Fight: भारतीय देशांतर्गत स्पर्धेतील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील उपांत्यपूर्व फेरीचे सामने संपले आहेत. या स्पर्धेचा शेवटचा उपांत्यपूर्व सामना दिल्ली आणि उत्तर प्रदेश संघांमध्ये बेंगळुरू येथे खेळला गेला. दिल्ली संघाने हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. मात्र या सामन्यादरम्यान दोन खेळाडू एकमेकांशी भिडले. नितीश राणा आणि युवा खेळाडू आयुष बदोनीमध्ये जोरदार वादावादी झाली. यानंतर पंचांनी प्रकरण शांत केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील दिल्लीच्या डावादरम्यान ही घटना घडली. दिल्लीच्या डावात उत्तर प्रदेशचा खेळाडू नितीश राणा गोलंदाजी करत होता. तर दिल्लीचा कर्णधार आयुष बडोनी क्रीजवर होता. त्याने नितीशच्या षटकात त्याने एक फटका खेळत धाव घेऊन नॉन स्ट्राइकवर पोहोचला. आयुष धाव घेऊन येत असताना नितीश राणा मध्ये आल्याने दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नितीश राणा त्याला काहीतरी बोलला आणि त्यानंतर बडोनीही प्रत्युत्तर देण्यासाठी सरसावला. यानंतर परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून पंचांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले.

हेही वाचा – SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका

आयुष बडोनी आणि नितीश राणा जुने मित्र आहेत. नितीश राणा याआधी दिल्ली संघाकडून खेळायचा आणि कर्णधारही होता. पण २०२३ मध्ये त्याने यूपीकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. याआधी आयपीएल २०२३ मध्ये नितीश राणाचा मुंबई इंडियन्सच्या हृतिक शौकीनबरोबरी वाद झाला होता. ह्रतिकदेखील दिल्ली संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.

हेही वाचा – Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज

दिल्ली आणि उत्तरप्रदेश या दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात उत्तर प्रदेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून १९३ धावा केल्या. यादरम्यान अनुज रावतने ३३ चेंडूत ७३ धावांची नाबाद खेळी केली. ज्यामध्ये ७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. तर प्रियांश आर्यने ४४ आणि यश धुलने ४२ धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करताना यूपीचा संघ १९.५ षटकांत १७४ धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान नितीश राणाला ३ चेंडूत केवळ २ धावा करता आल्या.

Story img Loader