Nitish Reddy Family Video IND vs AUS: नितीश रेड्डीने २१व्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी शतक झळकावत आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक केलं आहे. नितीश रेड्डीने फक्त त्याचे शतकच पूर्ण केले नाही तर त्याने मेलबर्न कसोटीत भारताचं आव्हान कायम ठेवलं आहे. नितीश रेड्डी १०५ धावा करत नाबाद परतला आहे. तर वॉशिंग्टन सुंदरबरोबर त्याने शतकी भागीदारी रचत भारताची धावसंख्या ३५८ वर नेली आहे. नितीश रेड्डीला आंतरराष्ट्रीय कसोटी खेळताना पाहण्यासाठी त्याचं संपूर्ण कुटुंब ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्याच्या या शतकानंतर त्याचे आई,वडिल आणि बहिण भावुक होत आनंद साजरा करताना दिसले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितीश रेड्डीच्या शतकाच्या वेळेस त्याचे वडिल आणि काक स्टेडियममध्ये उपस्थित होते. नितीशच्या प्रत्येक धावेवर त्याचे वडिल प्रार्थना करताना दिसले. नितीशने चौकार लगावत आपले शतक पूर्ण केले आणि त्याच्या वडिलांनी एकच जल्लोष केला आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. यानंतर खराब प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. यानंतर त्याच्या वडिलांनी उर्वरित कुटुंबाची भेट घेतली आणि सर्वच भावुक झालेले पाहायला मिळाले.

हेही वाचा – IND vs AUS: “मी टेन्शनमध्ये होतो, पण सिराजने…”, नितीश रेड्डीच्या वडिलांची लेकाच्या शतकावर पहिली प्रतिक्रिया, सिराजचा उल्लेख करत काय म्हणाले?

नितीशचे वडिल कुटुंबासह उभे असताना म्हणाले, “खूप वेगळी भावना आहे. आजचा दिवस खास आहे, नितीशचं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक. खूप खूप जास्त आनंदी आहे.” नितीशच्या बहिणीने भावुक होत त्याच्या शतकाबाबत बोलताना म्हणाली, “खूप आनंदी आहोत, आज सर्व आम्ही इथे त्याचा सामना पाहायला आलो होतो आणि त्याने त्याचवेळेस त्याने शतक झळकावलं आहे, हे शब्दात सांगण्यासारखं नाही. बाबा या शतकासाठी खूप प्रार्थना करत होते.”

हेही वाचा – IND vs AUS: नितीश रेड्डीचं पहिलं कसोटी शतक! ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर एकटा उभा ठाकला; वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू

विराट कोहली नितीश रेड्डीचा आदर्श आहे आणि त्याने नितीशच्या शतकावर उभं राहून त्याचं कौतुक केलं, यावर बोलताना त्याचे वडिल म्हणाले, विराट कोहलीने त्याला सांगितलं खूप कष्ट करायचे आहेत. यानंतर नितीशची आईदेखील भावुक झाली होती आणि तिनेही आनंद व्यक्त केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish reddy family emotional moment mother sister father reacted on his maiden test century called it precious gift video bdg