IND vs AUS 4th Test Day 3 Highlights in Marathi: भारताचा २१ वर्षीय तरूण खेळाडू नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियाविरूद्ध मेलबर्न कसोटीत आपले पहिले कसोटी शतक झळकावले आहे. नितीश कुमार रेड्डीने १७१ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह १०३ धावांची खेळी केली. नितीश कुमार रेड्डीच्या या शतकाचं सर्वाधिक सेलिब्रेशन त्याच्या वडिलांनी मैदानावर केलं. लेकासाठी स्वत:ची नोकरी सोडून त्याच्या क्रिकेटवर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. लेकाचं ऑस्ट्रेलियातील पहिलं शतक पाहून त्याच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आहेत.

नितीश रेड्डीच्या वडिलांनी त्याच्या शतकानंतर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहे. नितीश रेड्डीच्या वडिलांशी स्टेडियममध्येच एडम गिलक्रिस्टने संवाद साधला. नितीशचे वडिल इंग्रजीमध्ये फार काही बोलू शकले नाहीत. पण लेकाच्या शतकाबद्दल बोलताना म्हणाले, “आमच्या कुटुंबासाठी हा खूपच खास दिवस आहे आणि आमच्या आयुष्यात हा दिवस आम्ही हा दिवस कधीच विसरणार नाही. तो १४-१५ वर्षांचा असल्यापासूनच चांगली कामगिरी करत आहे आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही, खूप महत्त्वाचा आणि खास क्षण आहे.”

suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nitish Kumar Reddy Maiden Test Century in IND vs AUS Melbourne Test
IND vs AUS: नितीश रेड्डीचं पहिलं कसोटी शतक! ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर एकटा उभा ठाकला; वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू
Rohit Sharma career coming to an end says Mark Waugh after hitman dismissal in IND vs AUS 4th test
IND vs AUS : ‘…तर रोहितची कारकीर्द नक्कीच संपुष्टात येईल’, हिटमॅनबद्दल ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य
Sandeep Kshirsagar on Viral Photo
Sandeep Kshirsagar: तरुणीबरोबरच्या त्या व्हायरल फोटोवर आमदार संदीप क्षीरसागर यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “तो फोटो…”
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली नाही’, डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस्थळाच्या मागणीवर प्रणव मुखर्जींच्या लेकीचा संताप
Rishabh Pants bizarre dismissal at MCG leaves Sunil Gavaskar fuming
IND vs AUS : ‘मूर्खपणाची एक मर्यादा असते…’, ऋषभ पंतच्या खराब शॉटवर सुनील गावस्करांची संतप्त प्रतिक्रिया
ameya khopkar slams suresh dhas over prajakta mali
“तुमच्या गलिच्छ राजकारणात…”, अमेय खोपकरांची प्राजक्ता माळीचं नाव घेणाऱ्या सुरेश धस यांच्यावर टीका; म्हणाले, “हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे…”

हेही वाचा – IND vs AUS: नितीश रेड्डीचं पहिलं कसोटी शतक! ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर एकटा उभा ठाकला; वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू

नितीश रेड्डी ९९ धावांवर होता आणि जेव्हा सिराजकडे स्ट्राईक होती तेव्हा त्याच्या वडिलांच्या मनात काय सुरू होतं, हे सांगताना म्हणाले, “मी खूप टेन्शनमध्ये होतो. फक्त शेवटची विकेट बाकी होती. सिराजचे आभार तो चांगला खेळला आणि त्याने विकेट वाचवली.” नितीशचे वडिल मुत्याला रेड्डी प्रचंड भावुक दिसले. नितीशच्या वडिलांबरोबरच त्याचे काकाही तिथे उपस्थित होते आणि त्याचं संपूर्ण कुटुंबही ऑस्ट्रेलियामध्ये सामना पाहण्यासाठी हजर होतं.

हेही वाचा – IND vs AUS: नितीश रेड्डीचा दुर्मिळ विक्रम, ऑस्ट्रेलियाविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय फलंदाज

नितीश रेड्डीचं सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या जबरदस्त आणि भेदक गोलंदाजी आक्रमणासमोर मोक्याच्या क्षणी हे कसोटी शतक झळकावणं काही साधी गोष्ट नव्हती. पण नितीश रेड्डीने भारताचा डाव उचलून धरत एक चांगली धावसंख्या उभारली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ९ बाद ३५८ धावा केल्या आहेत. अजूनही भारतीय संघ ऑल आऊट झालेला नाही. भारताकडून नितीश रेड्डी १०५ धावा तर मोहम्मद सिराज २ धावा करून मैदानावर कायम आहे. यासह ऑस्ट्रेलियाचा संघ अजूनही ११६ धावा पुढे आहे.

Story img Loader