IND vs AUS Nitish Reddy Father Meets Sunil Gavaskar: नितीश कुमार रेड्डीचे कुटुंबीय आणि सुनील गावस्कर यांच्या मेलबर्नमधील भेटीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. नितीश रेड्डीच्या शतकाचं सर्वच माजी खेळाडूंनी खूप कौतुक केलं. नितीश रेड्डीच्या शतकाच्या वेळेस सुनील गावसकर इंग्रजीत कॉमेंट्री करत होते आणि त्याचं शतक पूर्ण होताच त्यांनी उभं राहून टाळ्या वाजवत कॉमेंट्री केली होती. आता त्याच्या या शतकानंतर त्यांनी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सुनील गावस्करांच्या भेटीदरम्यान नितीश रेड्डीच्या वडिलांनी त्यांच्या पायावर मस्तक ठेवत त्यांना अभिवादन केलं. भेटीदरम्यान नितीशचे वडिल भावुक झाले आणि त्यांनी गावस्कर यांना मिठी मारण्याऐवजी त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांना अभिवादन केलं. यावेळी, वडिलांना त्यांच्या काळातील महान फलंदाजाकडून त्यांच्या मुलाचं कौतुक देखील ऐकायला मिळालं. भेटीदरम्यान गावस्कर कुटुंबीयांना नितीशबद्दल सांगतात की तो भारतीय क्रिकेटचा हिरा आहे.
हेही वाचा – IND vs AUS: जसप्रीत बुमराहने घडवला इतिहास, दिग्गजांना मागे टाकत ठरला जगातील नंबर वन गोलंदाज
नितीशचे वडील मुत्याल्या रेड्डी यांनी सुनील गावस्कर यांच्या पायाला स्पर्श करून अभिवादन केले. यानंतर गुडघ्यावर बसून त्यांचे हात धरून त्यांचे आभार व्यक्त केले. नितीशच्या वडिलांची ही मान देण्याची पद्धत खूपच भावुक करणारी होती. नितीशचे वडील गुडघ्यावर बसून गावस्कर यांच्या पायाला स्पर्श करताना दिसत आहेत. नितीश रेड्डीच्या बहिणीनेही वडिलांप्रमाणेच सुनील गावस्कर यांच्या पायाला स्पर्श केला. भेटीदरम्यान सुनील गावस्कर यांनी नितीश कुमार रेड्डी आणि त्याच्या फलंदाजीबद्दल कुटुंबियांशी चर्चा केली.
नितीश कुमार रेड्डीच्या शतकी खेळीनंतर त्याच्या कुटुंबाची सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांनी भेट घेतली यावेळी गावस्कर म्हणाले की, नितीश यांच्या वडिलांचा संघर्ष मला माहत आहे. त्यांनी किती त्याग केला आहे हे आम्हाला माहित आहे. खूप संघर्ष केला. तुमच्यामुळे भारताला हिरा मिळाला आहे, भारतीय क्रिकेटला हिरा मिळाला आहे.
शनिवारी मेलबर्नमधील चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नितीशने शानदार शतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भारतीय संघ कठिण स्थितीत असताना तो मैदानावर टिकून राहिला आणि धावा करत संघाच्या धावसंख्येत मोठी भर घातली. मेलबर्न कसोटी सामना पाहण्यासाठी रेड्डी कुटुंब ऑस्ट्रेलियात आले होते. नितीशने त्यांना निराश केले नाही आणि या दौऱ्यातील आपली सर्वोत्तम खेळी खेळली.
नितीशचं शतक आणि वॉशिंग्टन सुंदरसह आठव्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारीने भारताला सामन्यात परत आणलं. एकवेळ भारताची धावसंख्या ७ गड्यांच्या मोबदल्यात २२१ धावा होती, पण भारत ३६९ धावा करत सर्वबाद झाला.