IND vs AUS 4th Test Day 3 Updates in Marathi: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नितीश रेड्डी हा भारताचा सर्वात मोठा तारणहार ठरला आहे. त्याने पहिल्याच सामन्यापासून आपल्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. मेलबर्नमध्येही त्याने आपल्या कौशल्याने उत्कृष्ट फलंदाजी करत अखेरीस पहिले कसोटी अर्धशतक झळकावले. याआधी मालिकेत तीन वेळा अर्धशतकाच्या जवळ पोहोचला होता पण दुर्दैवाने तो बाद झाला होता. मात्र बॉक्सिंग डे कसोटीत त्याने कोणतीही चूक केली नाही आणि ८१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. ५० धावा करताच त्याने ऑस्ट्रेलियन चाहत्यांसमोर पुष्पाच्या शैलीत सेलिब्रेशन केलंं.
मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने १५९धावांवर ५ विकेट गमावल्या. तिसऱ्या दिवसाची सुरुवातही चांगली झाली नाही. पहिल्या सत्रात भारताने महत्त्वाच्या विकेट गमावल्या. १९१ धावांवर ऋषभ पंत खराब शॉट खेळून बाद झाला, यानंतर जडेजालाही नाथन लायनने बाद करवत तिसऱ्या दिवशी भारताला धक्का दिला. यानंतर मैदानावर आलेल्या नितीश रेड्डीने भारताचा डाव उचलून धरला. पहिल्यांदा त्याने वॉशिंग्टन सुंदरबरोबर चांगली भागदारी रचत आणि बचावात्मक तसेच संधी मिळताच आक्रमक फटके खेळत भारताचा फॉलोऑन वाचवला. यानंतर रेड्डीने आपले अर्धशतक पूर्ण केले.
नितीश रेड्डीने चौकार लगावत आपले दणदणीत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर त्याने बॅट उंचावली आणि पाहताच त्याने पुष्पा चित्रपटातील अल्लु अर्जुनची सिग्नेचर पोझ बॅटने करत पुष्पा स्टाईल आपल्या खेळीचं सेलिब्रेशन केलं. नितीश रेड्डीच्या या खेळीने सर्वांनाच हुरूप आला. भारताने आतापर्यंत ३०० धावांचा टप्पा गाठला असून सुंदर आणि रेड्डी चांगली भागीदारी रचत आहेत.
नितीश रेड्डी-वॉशिंग्टन सुंदरची शतकी भागीदारी
त
६ विकेट गमावल्यानंतर नितीश कुमार रेड्डीने रवींद्र जडेजासोबत प्रथम ३१ धावांची छोटी भागीदारी केली. मात्र १७ धावा करून जडेजा बाद झाला. यानंतर रेड्डीने वॉशिंग्टन सुंदरबरोबर विकेट सांभाळून फलंदाजी केली आणि बरोबरच धावादेखील केल्या. वॉशिंग्टआतापर्यंत १०० अधिक धावांची भागीदारी केली आहे. मेलबर्नमध्ये तिसऱ्या दिवशी पावसाची शक्यता असल्याचे वर्तवण्यात आले होते आणि पावसाने अखेरीस हजेरी लावली आहे.
पावसाने हजेरी लावल्याने लवकर टीब्रेक घेण्यात आला आहे. टीब्रेक पूर्वी भारतीय संघ ७ बाद ३२६ धावांवर आहे. तर अजून भारत १४८ धावांनी मागे आहे. नितीश रेड्डी ८५ धावा करून त्याच्या पहिल्या शतकाच्या जवळ आहे. तर वॉशिंग्टन सुंदर ४० धावांसह अर्धशतक पूर्ण करण्याच्या जवळ आहे.