Nitish Reddy Turning Point of Career Video: भारत-ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताकडून दोन युवा फलंदाजांनी पदार्पण केले. नितीशकुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांना ऑस्ट्रेलियाविरूद्ध पदार्पणाची संधी मिळाली. दोघांनीही हा निर्णय अगदी योग्य असल्याचे पहिल्याच सामन्यात सिद्ध केले. नितीश रेड्डीने पर्थ कसोटीनंतर आता अॅडलेड कसोटीतही ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाची धावसंख्या १८० धावांपर्यंत नेली. नितीश रेड्डीच्या जीवनातील टर्निंग पॉईंट त्याने सांगितला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नितीश रेड्डीच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या काळात तो क्रिकेटचा फारसा गांभीर्याने विचार करत नव्हता. पण आर्थिक संघर्षामुळे वडिलांच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहिल्यानंतर त्याच्यासाठी सारं काही बदललं. युवा अष्टपैलू खेळाडूसाठी हा टर्निंग पॉइंट ठरला. यानंतर त्याने क्रिकेटला गांभीर्याने घेतले. कठोर परिश्रम करून क्रीडा क्षेत्रात यश संपादन करण्याचा निर्धार त्याने केला आणि त्याच्या या कठोर परिश्रमाचे फळ दिसत आहे.
बीसीसीआयने गुरुवारी नितीश रेड्डीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नितीश म्हणाला, खरं सांगायचं तर मी लहान असताना क्रिकेटला फारसं गांभीर्याने घेतलं नाही. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी त्यांची नोकरी सोडली आणि माझ्या यशासाठी खूप त्याग केला आहे, एके दिवशी आर्थिक समस्यांना तोंड देताना मी वडिलांना रडताना पाहिलं आणि मी विचार केला की तू असं नाही करू शकत, तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी इतका मोठा त्याग करत आहेत आणि तू फक्त मजा मनोरंजन म्हणून क्रिकेट खेळत आहेस.
नितीश पुढे म्हणाला, त्यावेळी मी क्रिकेटचा गांभीर्याने विचार केला आणि मग मी पुढे जात होता. मी कठोर मेहनत केली आणि मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा असल्याने मला खूप अभिमान आहे की माझ्यामुळे माझे वडील खूश आहेत, मी माझी पहिली जर्सी त्यांना दिली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहिला.”
नितीश रेड्डी विराट कोहलीला आपले प्रेरणास्थान मानतो. नितीश रेड्डीच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर त्याचे विराट कोहलीबरोबरचे लांबून काढलेले काही फोटो व्हायरल झाले होते. याबाबतही त्याने या व्हीडिओमध्ये उत्तर दिले. २०१८ च्या बीसीसीआय पुरस्कार सोहळ्यात जेव्हा त्याने कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माबरोबर सेल्फी काढला होता, तो व्हायरल झाला होता.
हेही वाचा – नो बॉल अन् ३७ धावा! ॲडलेड आणि वेलिंग्टन कसोटीत १२ मिनिटांच्या फरकाने घडली आश्चर्यचकित करणारी घटना
विराट-अनुष्काबरोबरच्या व्हायरल फोटोबाबत बोलताना रेड्डी म्हणाला, “तो एक सेफ्टी फोटो होता, विराट कोहली त्यावेळी खूप प्रसिद्ध होता. मला वाटलं नंतर कधी फोटो काढण्यासाठी संधी मिळेल नाही मिळेल माहित नाही. त्यामुळे आताच फोटो काढून घेतो. माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. मी लहानपणापासूनच विराट कोहलीचा मोठा चाहता आहे. मी त्याचा प्रत्येक सामना पाहायचो, जेणेकरून तो शतक करून त्या शतकाचं सेलिब्रेशन करताना मी पाहिन.