भारतीय हौशी बॉक्सिंग संघटनेवरील बंदी जोपर्यंत उठत नाही, तोपर्यंत भारतीय बॉक्सर्स आणि प्रशिक्षकांना जागतिक स्पर्धेत सहभागाची संधी दिली जाणार नाही, असे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने स्पष्ट केले. ‘‘भारतीय बॉक्सिंग संघटनेतील स्थिती सुधारण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आमच्यासमोर कोणताही पर्याय शिल्लक नाही. म्हणूनच भारताच्या बॉक्सर्सना जागतिक स्पर्धेत खेळता येणार नाही,’’ असे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे जनसंपर्क संचालक सेबेस्टियन गिलोट यांनी सांगितले. निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याच्या कारणावरून आंतरराष्ट्रीय महासंघाने भारतीय संघटनेवर बंदी घातली होती.

Story img Loader