India Tour of South Africa: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील पराभवातून सावरत भारताने आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीकडे लक्ष वेधले आहे. आगामी काळात भारतीय संघाला सलग टी-२० मालिकांना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कणा मजबूत करणाऱ्या रोहित आणि कोहली ही जोडी २०२२च्या विश्वचषकानंतर कुठल्याही टी-२० सामन्यात खेळलेली नाही. सध्या ते करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. त्यामुळे त्यांनी लांबचा विचार करत असल्याचे काही क्रिकेट तज्ञांचे म्हणणे आहे. यावर माजी खेळाडू आकाश चोप्राने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

गेल्या वर्षी फक्त टी-२० वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० मॅचमध्ये एकत्र दिसले होते. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने या दोन्ही खेळाडूंच्या टी-२० सामने न खेळण्याच्या मागे कारणावर मत व्यक्त केले आहे. आकाश चोप्राने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट केले की, “मला वाटत नाही की रोहितने कधीही कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जर तो असं म्हटला असेल तुम्ही मला दुरुस्त करा. जर माझे काही चुकले असेल तर मला सांगा पण त्याने कधीच नाही म्हटले की मी टी-२० क्रिकेट खेळणार नाही. त्याबद्दल त्याला तो खेळणार आहे की याचे उत्तर देण्याची गरज नाही, असे मला वाटते.”

माजी सलामीवीर फलंदाजाने पुढे लिहिले की, “खरं तर, गेल्या टी-२० विश्वचषकापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतासाठी खेळलेल्या कोणत्याही टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेचा भाग का नव्हते? याचा कोणीही उल्लेख केलेला नाही. हे एक गूढ आहे आणि कोणीही ते सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. ते आगामी टी-२० विश्वचषक खेळणार नाहीत, असे कोणीही सांगितलेले नाही.”

ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडला होता. या सामन्यातच कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० सामना खेळताना दिसले होते. इंग्लंडविरुद्धच्या पराभवाला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. तेव्हापासून या दोन्ही खेळाडूंनी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटपासून अंतर लांब आहेत.

हेही वाचा: T20 World Cup 2024: युगांडा क्रिकेट संघाने इतिहास रचला, २०२४च्या टी-२० विश्वचषकासाठी पहिल्यांदाच ठरला पात्र

दोन्ही खेळाडूंना सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी, ताज्या माहितीनुसार, विराट कोहलीने आगामी दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतील टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. याबाबत त्याने बीसीसीआयला विनंती केल्याचेही समोर आले आहे.

Story img Loader