कसोटी मालिका आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि आता डावपेच रंगात आले आहेत. भारताचा अनुभवी फलंदाज सचिन तेंडुलकरला मैदानावर फार आदरार्थी वागणूक देऊ नये, अशा प्रकारचा कानमंत्र वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने आपल्या इंग्लिश सहकाऱ्यांना दिला आहे.
‘‘सचिन हा एक सर्वोत्तम फलंदाज आहे, याविषयी माझ्या मनात अजिबात दुमत नाही. परंतु मैदानावर त्याचा फार आदर आम्ही करणार नाही, हे मात्र आम्ही निश्चित केले आहे,’’ असे अँडरसन याने लिहिले आहे.
‘‘सचिनला फलंदाजी करताना पाहायला आम्हाला फार आवडते, असे क्रिकेटरसिक म्हणतात. परंतु या भावनेमुळे स्पर्धात्मकतेला धक्का लागता कामा नये,’’ असे त्याने पुढे नमूद केले आहे. ‘‘सचिन हा घटक अनुभवण्यासारखा असतो. मी भारतीय समर्थकांना संघाच्या कामगिरीपेक्षा सचिनच्या फलंदाजीचाच आनंद लुटताना पाहिलेले आहे. जेव्हा सचिन बाद होतो, तेव्हा चाहत्यांची मोठी निराशा होते,’’ असे अँडरसनने लिहिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा