Sunil Gavaskar on Rohit Sharma: ओव्हल येथे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2023) फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी रोहित शर्माला त्यासाठी जबाबदार का धरले नाही? असा उद्विग्न सवाल उपस्थित करत बीसीसीआयवर टीका केली. ते म्हणाले की, “जर बीसीसीआयने सक्षम निवडकर्ता नियुक्त केला असता तर त्याने कर्णधाराला त्याच्या निर्णयांबद्दल काही कठोर प्रश्न विचारले असते.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने WTC फायनलमध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये आर. अश्विनपेक्षा उमेश यादवला निवडले असल्याचे सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले. दोन्ही निर्णयांनी भारतीय संघाला सामना २०९ धावांनी गमवावा लागला. रोहित शर्माला पुढील महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. भारतीय संघ पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2023-25) चक्राची सुरुवात देखील करेल.

सुनील गावसकर यांनी सध्याच्या सेटअपमधील संघ निवड प्रक्रियेवर काही आक्षेप व्यक्त केले आहेत. त्यांनी आपल्या काळातील दिवसांकडे लक्ष वेधले आणि सांगितले की सध्या सिस्टममध्ये जबाबदारीची कमतरता आहे. आताच्या काळात कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाला कोणीही कठोर प्रश्न विचारत नाही.” वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची चर्चा करताना गावसकर म्हणाले की, “बोर्डाने आदर्शपणे एक बैठक बोलावली पाहिजे जिथे कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाच्या सदस्यांना WTC फायनलमधील काही वादग्रस्त निर्णयांबद्दल विचारले जाईल.”

हेही वाचा: Ishant Sharma: इशांत शर्माने भारताच्या ‘या’ गोलंदाजाला जेम्स अँडरसनपेक्षा सांगितले सरस; म्हणाला की, “भारतातील खेळपट्ट्यांवर…”

“डब्ल्यूटीसी फायनलनंतर तुमची बैठक झाली होती का? तिथे तुम्ही कर्णधाराची नियुक्ती करावी की नाही यावर चर्चा केली होती? जेव्हा आम्ही मोठ्या स्पर्धा खेळायचो तेव्हा निवड समितीची बैठक व्हायची जिथे कर्णधाराची नियुक्ती केली जायची. त्यानंतर, त्याला दोन बैठकीत सामील होण्यास सांगितले जायचे. काही दिवसांनंतर तो निवडकर्त्यांना संघाला काय हवे आहे हे सांगायचा.” असे गावसकर पुढे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

“आपल्या क्रिकेटमध्ये आता असं होत नाही. एकदा तुम्ही कर्णधार निवडला की, तो काहीही निर्णय घेत असो त्याला कुठलेही प्रश्न विचारले जात नाहीत, तो कर्णधारपदी राहतो. तुम्ही कितीही मालिका गमावल्या तरी काहीही फरक पडत नाही कारण, तुम्हाला बदलले जाणार नाही. सध्या असा नियम बहुतेक बीसीसीआयमध्ये आहे. जर तुमची कामगिरी चांगली असेल तर तुम्ही कर्णधार असले पाहिजे”, गावसकर स्पोर्ट्स तकवर म्हणाले.

हेही वाचा: IND vs PAK: भारतापुढे पाकिस्तान माघार! BCCI अन् ICCने पीसीबीची केली कोंडी, वर्ल्डकप वेळापत्रकावर शिक्कामोर्तब

गावसकर म्हणाले, “रहाणेला उपकर्णधार करण्यात काहीच चूक नाही, पण तरुण खेळाडूला तयार करण्याची संधी गमावली. निदान एखाद्या युवा खेळाडूला तरी सांगा की आम्ही भावी कर्णधार म्हणून तुझ्याकडे पाहत आहोत. त्यामुळे या वेस्ट इंडीज दौऱ्यावर भावी कर्णधार म्हणून विचार करायला हवा होता.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No responsibility gavaskar questions bcci selectors over rohit sharmas decision in wtc 2023 final avw