Is Shubman Gill Has a Crush on Rashmika Mandanna: सध्या गॉसिप कॉरिडॉरमध्ये भारतीय क्रिकेटर शुबमन गिलच्या नावाची खूप चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून तो सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खानला डेट केल्यामुळे चर्चेत आहे. मात्र आता या अफवांवर सुरू असलेल्या सर्व अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे. याला कारण आहे दाक्षिणात्य अभिनेत्री. याचा खुलासा खुद्द क्रिकेटपटूने केला आहे. दाक्षिणात्य अभिनेत्रीचे नाव समोर येताच सारा अली खानचे नाव मागे पडले आहे. चला जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री, जिने तेंडूलकर आणि सैफ या दोघांच्या  सारांचा पत्ता कट केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्या अभिनेत्रीला शुबमन गिलने आपले क्रश म्हटले आहे ती दुसरी कोणी नसून रश्मिका मंदाना आहे. सारा अली खानचे नाव अनेक दिवसांपासून शुबमन गिलसोबत जोडले जात आहे. अनेकवेळा दोघेही एकत्र स्पॉट झाले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जेव्हा दोघे एकाच हॉटेलमध्ये दिसले होते, तेव्हा त्यांच्या अफेअरच्या अफवांना जोर आला होता. अनेक प्रसंगी सारा अलीचे नाव घेऊन शुबमनची खिल्ली उडवली जात होती.

@instantbollywood च्या इंस्टाग्राम पेजवर शुबमन गिल आणि रश्मिका मंदाना यांचा फोटो पोस्ट केला आहे. त्याचे कॅप्शन असे लिहिले आहे की, ‘अलीकडेच माध्यमांशी संवाद साधताना शुबमन गिलला विचारण्यात आले की त्याला कोणती अभिनेत्री सर्वात जास्त आवडते. सुरुवातीला शुबमनने हसून प्रश्नाचे उत्तर टाळण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा विचारले असता त्याने रश्मिका मंदाना यांचे नाव घेतले पण ती क्रश आहे का यावर त्याने मौन सोडले.

पोस्टमध्ये म्हटले आहे की शुबमन गिलने नुकतेच मीडिया संवादात रश्मिकावर क्रश असल्याची कबुली दिली होती. आता चाहते भारतीय अभिनेत्रीच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, शुबमन गिलने त्या पोस्टवर कमेंट करून अफवांचे त्वरीत खंडन केले. पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, शुबमन गिलच्या रश्मिकासाठी ‘कुछ पाकने’ ची बातमी आता व्हायरल झाली आहे आणि रश्मिकाचे चाहते सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. शुबमनच्या या वक्तव्यावर रश्मिकाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि रश्मिका यावर काय प्रतिक्रिया देईल याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. शुबमन गिलने पोस्टच्या खाली दिलेल्या कमेंटमध्ये लिहिले की, “हा कोणता मीडिया संवाद होता, ज्याबद्दल मला स्वतःला माहिती नाही.”

हेही वाचा: DC-W vs UPW-W: WPL २०२३ मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स करणार यूपी वॉरियर्सशी दोन हात, कोण ठेवणार आपली विजयी घौडदौड कायम?

शुबमन गिलच्या या कमेंटवर रश्मिका मंदानाने सध्या तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ती काय उत्तर देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. याआधी शुबमन गिलनेही सारासोबत डेटिंगच्या बातम्यांवर मौन सोडले आहे. एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा तिला बॉलिवूडमधील सर्वात योग्य अभिनेत्रीचे नाव विचारण्यात आले तेव्हा गिलने साराचे नाव घेतले. जेव्हा त्याला विचारण्यात आले की, “तू साराला डेट करत आहेस का?’ यावर तो म्हणाला होता, ‘कदाचित.’ रश्मिका मंदानाने एका मुलाखतीत महेंद्र सिंह धोनीला तिचा आवडता क्रिकेटर असल्याचे सांगितले होते. रश्मिका मंदाना म्हणाली होती की, “एमएस धोनीने त्याच्या कर्णधारपदामुळे आयपीएलवर वर्चस्व कायम ठेवले आहे, त्यामुळे तो अजूनही माझा आवडता क्रिकेटर आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No sara tendulkar no sara ali khan is shubman gill has a crush on rashmika mandanna check the truth avw