ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना आणि सामन्याचे ३१वे षटक. गोलंदाजी करत होता आर.अश्विन तेही ‘राऊंड द विकेट’ बाजूने आणि पहिले चारही चेंडु एकाच प्रकारचे टाकून ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सहजगत्या चारही चेंडुवर काढल्या प्रत्येकी दोन धावा. या गोलंदाजीवर सामन्याचे समालोचन करत असणारे सुनिल गावसकर आणि एल.शिवरामाक्रिश्नन यांनी टीकेची सुर उमटवलाच.
पाचव्या चेंडुत वेगळेपणा आणण्याचा अश्विनने प्रयत्न केला खरा पण, जॉर्ज बेलीने चेंडुला सीमारेषेपार जागा दाखवत चौकार खेचला. यावरून सामन्यात गोलंदाजीत कोणताही वेगळेपणा वापरण्यावर अश्विनला चांगलेच प्रत्युत्तर मिळत होते. यावरून सुनिल गावस्कर यांनी ‘अश्विन फक्त ऑफ स्पिन गोलंदाजीच उत्तम करतो’ असे म्हटले.
यासर्व एकंदर माहितीवरून अश्विनच्या गोलंदाजीची तीष्णता हरवली असल्याचेच समोर येत आहे. त्याच्या गोलंदाजीतला वेगळेपणा प्रतिस्पर्धी संघांना समजू लागला आहे. त्याच्या गोलंदाजीच्या अॅक्शन वरुन आता चेंडु कोणत्याप्रकारचा असेल याची कल्पना फलंदाजांना येऊ लागली आहे की काय? असेच चित्र आहे. त्यामुळे अश्विनला आपल्या गोलंदाजीला धार काढावी लागणार एवढे नक्की!

Story img Loader