भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. दोन्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्यांच्या श्रेणीतील महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे. महिला गटात हरमनप्रीत महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली आहे, तर रिझवानला पुरुष गटात हा बहुमान मिळाला आहे.
विराट कोहली, रोहित शर्मासारख्या खेळाडूंना मोह्ममद रिझवानशी बरोबरी करता आली नव्हती. पण आता भारताच्या हरमनप्रीत कौरने रिझवानशी बरोबरी केली आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये इतिहास रचला होता, कारण भारताला १९९९ नंतर एकदाही इंग्लंडमध्ये विजय मिळवता आला नव्हता. पण आता हरमनप्रीतच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
हरमनप्रीतने इंग्लंडमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली
हा पुरस्कार मिळवण्यासाठी हरमनप्रीत कौरने सहकारी खेळाडू स्मृती मानधना आणि बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना यांना मागे टाकले. हरमनप्रीतने अलीकडेच इंग्लंडमध्ये चमकदार कामगिरी केली होती आणि ऐतिहासिक विजयात सामना जिंकणारी खेळी खेळली होती. तिने सप्टेंबरमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत १०३.२७ च्या स्ट्राइक रेटने २२१ धावा केल्या आणि ती या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती.
हरमनप्रीतने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ७४ धावांची नाबाद खेळी केली आणि त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १११ चेंडूत १४३ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये प्रथमच क्लीन स्वीप करून इतिहास रचला. १९९९ नंतर इंग्लंडमध्ये भारतीय महिला संघाचा हा पहिला मालिका विजय होता. प्रत्येक महिन्यात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या खेळाडूला आयसीसी पुरस्कार देत असते. यावेळी हरमनप्रीतला इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला.
पुरुष विभागाबाबत बोलायचे झाले तर पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानलाही त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले. या प्रकरणात रिझवानने भारतीय फिरकी अष्टपैलू अक्षर पटेल आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला मागे टाकले. रिझवानसाठी सप्टेंबर महिना खूप चांगला होता. त्याने टी२० मध्ये एकामागून एक अनेक मॅच विनिंग इनिंग खेळल्या. गेल्या महिन्यात त्याने १० सामन्यांत सात अर्धशतके झळकावली. यामध्ये त्याने आशिया चषकामध्ये हाँगकाँग आणि त्यानंतर भारताविरुद्ध ७० हून अधिक धावा केल्या होत्या. आशिया चषक स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असताना, त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सात सामन्यांच्या मालिकेत ६३.२० च्या सरासरीने ३१६ धावा केल्या.