Sri Lanka vs Afghanistan Test Match : कोलंबो येथे २ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानच्या ४ खेळाडूंना पदार्पण कॅप मिळाली. यामध्ये मोहम्मद सलीम, नवीद झद्रान, झिया उर रहमान आणि नूर अली झाद्रान यांच्या नावांचा समावेश आहे. या चार खेळाडूंमध्ये, नूर अली झाद्रानचे पदार्पण सर्वात जास्त चर्चेत होते. कारण त्याला २२ वर्षीय इब्राहिम झाद्रानने पदार्पण कॅप दिली होती, जो नूर अली झाद्रानचा भाचा आहे. नूर अली झाद्रानने वयाच्या ३५ व्या वर्षी अफगाणिस्तानच्या कसोटी संघात पदार्पण केले.

काका-पुतण्याने दिली सलामी –

२२ वर्षांच्या पुतण्याने ३५ वर्षांच्या काकांना कसोटी पदार्पणाची कॅप दिली हे क्रिकेटच्या मैदानावरील हे दृश्य स्वतःच मनोरंजक होते. एवढेच नाही तर काका-पुतण्याने अफगाणिस्तानसाठी डावाची सलामीही दिली. पहिल्या डावात ही जोडी काही विशेष करू शकली नाही, पण दुसऱ्या डावात दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली. नूर अली झाद्रान आणि इब्राहिम झाद्रान यांनी पहिल्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी नूरच्या विकेटसह तुटली. त्याने ४७ धावा केल्या.

नूर १४ वर्षांपासून अफगाणिस्तानकडून खेळत आहे –

नूर अली झाद्रानने अफगाणिस्तानसाठी १४ वर्षे क्रिकेट खेळले आहे, पण या १४ वर्षांच्या करिअरमध्ये तो कसोटी पदार्पण करू शकला नाही. त्याला श्रीलंकेविरुद्ध अफगाणिस्तान कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे त्याचा पुतण्या इब्राहिम झाद्रानने त्याला पदार्पणाची कॅप दिली. नूर अलीचा आणखी एक पुतण्या अफगाणिस्तानसाठी क्रिकेट खेळतो. त्या खेळाडूचे नाव आहे मुजीब उर रहमान.

हेही वाचा – IND A vs ENG Lions : भारत अ संघाने इंग्लड लायन्सचा १३४ धावांनी उडवला धुव्वा, तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली

इब्राहिम झाद्राने झळकावले शतक –

इब्राहिम झाद्राने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी शतक झळकावले. त्याने २१७ चेंडूचा सामना करताना ११ चौकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावा केल्या. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर १ बाद १९९ धावा करु शकला आहे. त्याचबरोबर अजूनही ४२ धावांनी पिछाडीवर आहे. श्रीलंकेकडून दुसऱ्या डावात असिता फर्नांडोने एक विकेट घेतली.

हेही वाचा – BPL 2024 : खुलना टायगर्सविरुद्ध शोएब मलिकने अष्टपैलू कामगिरी करत टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर

कोलंबो कसोटीत आतापर्यंत काय घडले?

श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून सुरू झाला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाने पहिल्या डावात १९८ धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून विश्वा फर्नांडोने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर असिता फर्नांडो आणि प्रभात जयसूर्याने ३-३ विकेट्स घेतल्या. श्रीलंकेने पहिल्या डावात ४३९ धावा केल्या आणि २४१ धावांची आघाडी घेतली. अफगाणिस्तानने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर ७५ षटकानंतर एक गडी गमावून १९९ धावा केल्या आहेत.

Story img Loader