पीटीआय, स्टॅव्हंगर (नॉर्वे) : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने नॉर्वे अ-गट खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. प्रज्ञानंदने नऊ फेऱ्यांमध्ये एकूण ७.५ गुणांची कमाई केली. गेल्या महिन्यात चेसेबल मास्टर्स स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवणाऱ्या प्रज्ञानंदला नॉर्वे अ-गट खुल्या स्पर्धेसाठी अग्रमानांकन लाभले होते. त्याने या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करताना नऊपैकी सहा सामने जिंकले आणि तीन सामने बरोबरीत सोडवले. प्रज्ञानंदने या स्पर्धेतील अखेरच्या फेरीत भारताच्याच व्ही. प्रणीतला पराभूत केले.
नॉर्वे अ-गट बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदला अजिंक्यपद
भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने नॉर्वे अ-गट खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
First published on: 12-06-2022 at 00:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Norway a group chess tournament pragyananda wins young grandmaster ysh