पीटीआय, स्टॅव्हंगर (नॉर्वे) : भारताचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने मंगळवारी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या पारंपरिक (क्लासिकल) विभागातील पहिल्या फेरीत मॅक्झिमे वाशिये-लॅग्रेव्हला ४० चालींत पराभूत केले. भारतीय ग्रँडमास्टर आनंदने या विजयाद्वारे तीन गुणाची कमाई केली. याचप्रमाणे अमेरिकेच्या वेस्टली सो याने तैमूर राजाबोव्हला नमवून आनंदसह संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले आहे. मॅग्नस कार्लसनने (१.५ गुण) चीनच्या वांग हाओशी (१ गुण) बरोबरी साधली. याचप्रमाणे अनिश गिरी (१.५ गुण) आणि व्हेसेलिन टोपालोव्ह (१ गुण) तसेच शाखरियार मॅमेडायारोव्ह (१.५ गुण) आणि आर्यन तारी (१ गुण) यांच्यातील सामनेसुद्धा बरोबरीत सुटले. पारंपरिक प्रकारात बरोबरीचा निकाल लागल्यास अर्मेगेडोन (सडन डेथ) डाव खेळवण्यात येतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in