ऑस्ट्रेलियाचा संघनायक मायकेल क्लार्क मानसिकदृष्टय़ा खचलेल्या शॉन अॅबॉटच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. अॅबॉटच्या उसळत्या चेंडूने युवा फलंदाज फिलिप ह्युजेसचा मृत्यू ओढवला.
मंगळवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरील स्थानिक सामन्यात झालेल्या या अपघातानंतर २२ वर्षीय अॅबॉटला सावरण्यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेबाबत कुणीही अॅबॉटला जबाबदार धरलेले नाही. संपूर्ण ऑस्ट्रेलियाचा संघ त्याच्या पाठीशी आहे. मैदानावर परतण्यासाठी आम्ही त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करू, असे क्लार्कने सांगितले.
‘‘मला अॅबॉटविषयी बोलायची इच्छा आहे. या तरुणाला खूप चांगले भविष्य आहे; परंतु या घटनेचा त्याच्या आयुष्यावर गंभीर परिणाम झाला आहे. हा खरे तर एक दुर्दैवी अपघात आहे,’’ असे क्लार्कने सांगितले.
‘‘जे काही घडले, त्याबद्दल कुणीही, नव्हे एकाही व्यक्तीने अॅबॉटला जबाबदार धरले नाही. आमचा त्याला संपूर्ण पाठिंबा आहे,’’ असे क्लार्कने ‘हेराल्ड सन’ला सांगितले. क्लार्कने आपला जीवश्चकंठश्च मित्र फिलिपला श्रद्धांजली वाहताना या कठीण काळात देशवासीयांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले.
अॅबॉटला कुणीही जबाबदार धरलेले नाही!
ऑस्ट्रेलियाचा संघनायक मायकेल क्लार्क मानसिकदृष्टय़ा खचलेल्या शॉन अॅबॉटच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे.
First published on: 01-12-2014 at 04:47 IST
TOPICSफिलिप हय़ुजेस
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not a single person blames abbott clarke