Harmanpreet Kaur TIME100 Next: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही टाइम १०० नेक्स्ट २०२३मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. हरमनप्रीतने विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुलसारख्या स्टार क्रिकेटपटूंना मागे टाकत टाइम १०० लीडर्सच्या यादीत स्थान मिळवले आहे.

टाइमने जगभरातील १०० उदयोन्मुख नेत्यांची TIME100 Next 2023 यादी प्रसिद्ध केली आहे. टाईमने आपल्या यादीत १०० अशा लोकांचा समावेश केला आहे जे भविष्याला आकार देत आहेत आणि पुढच्या पिढीच्या समोर एक आदर्श नेतृत्वाची व्याख्या तयार करत आहेत. हरमनप्रीत कौरला टाइम १०० यादीतील इनोव्हेटर्स श्रेणीत स्थान मिळाले आहे. हरमनप्रीत कौर व्यतिरिक्त, टाइम १००च्या या यादीमध्ये जालेन हर्ट्स, एंजल रीझ, रोनाल्ड अकुना जूनियर, रोझ झांग, सलमा पार्लुएलो आणि सोफिया स्मिथ यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Tim Southee Retirement From Test Cricket After 3 match Home Series Against England Said its tough decision but it is the right one
रोहित-सेहवागपेक्षा सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या गोलंदाजाने जाहीर केली निवृत्ती, ‘हा’ कसोटी सामना अखेरचा
Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings
Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत

भारतीय महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्याचे श्रेय हरमनप्रीतला जाते.

हरमनप्रीत कौरने तिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेले आहे. हरमनप्रीतने सहा वर्षांपूर्वी २०१७च्या महिला विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११५ चेंडूत १७१ धावांची दमदार खेळी करून आपली महानता सिद्ध केली होती. कौरच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२२च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

हरमनप्रीत कौरने यंदाच्या महिला प्रीमियर लीगच्या संपूर्ण हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्वही केले आणि संघाला विजयी देखील केले. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही हरमनप्रीत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. अलीकडेच, बांगलादेशमधील एकदिवसीय मालिकेदरम्यान, हरमनप्रीत कौरला अंपायरवर टीका केल्याबद्दल दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आणि मॅच फीच्या ७५% दंड ठोठावण्यात आला.

हेही वाचा: SL vs PAK: पावसाने वाढवली पाकिस्तान-श्रीलंका संघाची धाकधूक, सामना रद्द झाल्यास कोण जाणार फायनला? जाणून घ्या समीकरण

हरमनप्रीत कौरचे आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा इतिहास रचण्याचे लक्ष

भारतीय महिला संघ २१ सप्टेंबरपासून आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेत हरमनप्रीत कौर टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे. कौरच्या नेतृत्वाखालील या संघात स्मृती मंधांना, जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया आणि रिशा घोष या खेळाडूंचा समावेश आहे. या भारतीय संघात युवा आणि अनुभवी अशा दोन्ही खेळाडूंचा समतोल आहे.

गेल्या दोन वर्षांपासून हरमनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली जरी, कामगिरी केली असली तरी भारतीय संघाला विजेतेपद मिळवता आलेले नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद जिंकून भारतीय महिला संघाचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचे ध्येय असेल. भारतीय संघ आयसीसी महिला टी२० क्रमवारीच्या आधारे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतून थेट खेळणार आहे. हरमनप्रीत कौरने आतापर्यंत १२७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५ शतके आणि १८ अर्धशतकांच्या मदतीने ३७.७०च्या सरासरीने ३३९३ धावा केल्या आहेत. याशिवाय हरमनप्रीतने १५४ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १ शतक आणि ११ अर्धशतकांच्या मदतीने २८.३९च्या सरासरीने ३१५२ धावा केल्या आहेत.

हेही वाचा: Waqar Younis: पाकिस्तानच्या वकार युनूसचे आश्चर्यचकित करणारे विधान; म्हणाला, “विराट कोहली एवढे शतके करेल जेवढे…”

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधांना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मनी, कानू मणी, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अनुषा बरेड्डी.