Gavaskar on MS Dhoni vs Kapil Dev: २५ जून १९८३ रोजी, टीम इंडियाने पहिलावहिला विश्वचषक जिंकून इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपले नाव कोरले. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने या स्पर्धेत जगातील काही सर्वोत्तम संघांना पराभूत करून अविश्वसनीय अशी कामगिरी केली. या ऐतिहासिक विजयाला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा परिस्थितीत चॅम्पियन संघाचे खेळाडू सुनील गावसकर यांनी माजी कर्णधार कपिल देव यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या मते एम.एस. धोनी नाही तर कपिल देव हे खरे ‘कॅप्टन कूल’ आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धोनी नाही, हा दिग्गज खरा ‘कॅप्टन कूल’ आहे

महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेट इतिहासातील महान कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. काही अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत खूप शांत राहण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे त्याला चाहते आणि सहकारी यांच्याकडून ‘कॅप्टन कूल’ हे बिरुदावली मिळाली आहे. मात्र, महान भारतीय फलंदाज सुनील गावसकर यांच्या मते, कपिल देव हा खरा ‘कॅप्टन कूल’ असून एम.एस. धोनी नाही.

हेही वाचा: Yashasvi Jaiswal: “एक दिवस भारतासाठी…”, कधी काळी झाडावर चढून सामना पाहणारा कसोटी संघात स्थान मिळवण्यात यशस्वी!

गावसकर यांनी कपिल देव यांची स्तुती करताना असे म्हटले आहे

१९८३च्या ४०व्या वर्धापनदिनानिमित्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी झालेल्या चर्चेदरम्यान सुनील गावसकर म्हणाले की, “कपिल देव यांनी त्या विश्वचषकात बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये अष्टपैलू कामगिरी होती. अंतिम फेरीत त्यांनी विव्ह रिचर्ड्सचा घेतलेला झेल विसरता येणार नाही. त्यांची कॅप्टन्सी ही खूप अफलातून आणि गतिमान होती. नेमके काय आवश्यक होते याचे त्यांनी उत्तम प्लॅनिंग केले होते. एखाद्या खेळाडूने झेल सोडल्यावरही त्यांचे हावभाव हे त्याला पाठिंबा देणारे होते. ते नेहमी चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवत यामुळेच कपिल देव ओरिजिनल ‘कॅप्टन कूल’ बनले आहेत.”

हेही वाचा: Chris Gayle: ‘युनिव्हर्स बॉस’ला पडली रोनाल्डोच्या सेलिब्रेशनची भुरळ, गेलच्या पोस्टवर युवराज सिंगची खास प्रतिक्रिया, Video व्हायरल

विजयानंतरच्या क्षणांचे वर्णन करणे कठीण – गावसकर

याशिवाय गावसकर यांनी विश्वचषक जिंकल्यानंतर संपूर्ण संघाने कसा आनंदोत्सव साजरा केला याबद्दल सांगितले. “कारण, जर आपण विचार केला तर भारत हा विश्वचषक जिंकेल असे कोणाला वाटत नव्हते. जेतेपद मिळवल्यानंतर प्रत्येकाला शब्दांची कमतरता होती” असे ते पुढे म्हणाले. गावसकरांनी पुढे सांगितले, “विजयानंतरच्या क्षणांचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. ही टूथपेस्टसाठी एक उत्तम जाहिरात बनवू शकले असते कारण आपल्या आजूबाजूचे प्रत्येकजण हसत होता आणि दुसऱ्यालाही हसवत होता, ते क्षण पाहून सर्व देशवासीयांचे मन प्रसन्न झाले होते.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not ms dhoni kapil dev is indias original captain cool sunil gavaskar made a big statement avw