10 teams including Pakistan Netherlands will get bumper prize money: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत आमनेसामन येणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ जगज्जेता होईल, तर हरणारा संघ उपविजेता मानला जाईल. या विश्वचषकाच्या समाप्तीनंतर कोणाला किती बक्षीस रक्कम दिली जाईल, त्याबद्दल आपण जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वचषकात कोणाला किती रुपये बक्षीस मिळणार?

आयसीसी विश्वचषक २०२३ च्या विजेत्या संघाला ४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ३३ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
या विश्वचषकाच्या उपविजेत्या संघाला २ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे १६.६४ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडलेल्या संघांना म्हणजेच न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांना ८ लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ६.६० कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
या विश्वचषकात लीग स्टेजमधून बाहेर पडलेल्या संघांना १ लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ८३ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
याशिवाय, लीग टप्प्यातील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला ४०,००० यूएस डॉलर्स म्हणजेच सुमारे ३३ लाख रुपये दिले जातील.

हेही वाचा – IND vs AUS Final : वर्ल्डकप फायनलमध्ये केटलबोरो असणार मैदानी पंच, भारतीयांच्या पोटात भीतीचा गोळा! कारण काय?

अंतिम सामन्यात कोणाचे वर्चस्व?

या विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या विश्वचषकात भारताने आपले सर्व १० सामने जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र त्यानंतर त्यांच्या संघाचा फॉर्म जबरदस्त राहिला आहे. अशा परिस्थितीत या दोन संघांमध्ये शानदार अंतिम सामना अपेक्षित आहे.

हेही वाचा – IND vs AUS Final : वर्ल्डकप फायनलमध्ये केटलबोरो असणार मैदानी पंच, भारतीयांच्या पोटात भीतीचा गोळा! कारण काय?

तथापि, भारत आणि ऑस्ट्रेलिया याआधी एकदा एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळले आहेत, जो २००३ चा अंतिम सामना होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १२५ धावांनी पराभव करत विश्वचषक जिंकला होता. आता तब्बल २० वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा आमनेसामने आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघ यावेळेस आपल्या २० वर्ष जुन्या पराभवाचा बदला घेऊ शकतो का, हे पाहावे लागेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not only india and australia all 10 teams including pakistan netherlands will get bumper prize money in world cup vbm
Show comments