ODI World Cup 2023: २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. संपूर्ण विश्वचषकाचे यजमानपद भारताला देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयसीसी ट्रॉफीचा १० वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी संघाचा डोळा या ट्रॉफीवर असणार आहे. भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी २०१३ मध्ये जिंकली होती. रोहित शर्मा, विराट कोहली आदी स्टार्सनी सजलेला हा संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. मात्र, मोहम्मद कैफच्या मते ना रोहित शर्मा ना विराट कोहली भारताला जसप्रीत बुमराहच टीम इंडियाला विश्वचषक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह एका वर्षापासून टीम इंडियातून बाहेर होता. दुखापतग्रस्त बुमराह गतवर्षीही विश्वचषक आणि आशिया चषक खेळला नव्हता, त्यामुळे संघाला त्याची उणीव भासली होती. मात्र, आता तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. बुमराह आयर्लंड मालिकेद्वारे पुनरागमन करत आहे, या दौऱ्यावर त्याला भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. तो पूर्णपणे तंदुरुस्त राहिल्यास त्याचा विश्वचषक संघात निश्चितपणे समावेश केला जाईल.

हेही वाचा: IND vs WI: तिसऱ्या सामन्याआधी वेस्ट इंडीजला मोठा धक्का! निकोलस पूरनला अंपायरशी वाद घालणं पडलं महागात, आयसीसीने केली कारवाई

टाईम्स ऑफ इंडियाशी झालेल्या संभाषणात माजी भारतीय खेळाडू मोहम्मद कैफ म्हणाला, “वेस्ट इंडिजविरुद्ध सलग २ सामने गमावूनही चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही. या मालिकेच्या निकालावर संघाचे मोजमाप करणे योग्य नाही. बुमराहची अनुपस्थिती ही एक मोठी बाब आहे आणि त्याच्या पुनरागमनामुळे संघाचे मनोबल उंचावेल आणि टीम इंडियाला विश्वचषक जिंकण्यास मदत होईल.”

दिग्गज खेळाडू कैफ पुढे म्हणाला, “भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध २ सामने गमावले आहेत, आपण याबद्दल जास्त विचार करू नये. या दोन पराभवानंतर चाहते नकारात्मक प्रतिक्रिया येत असल्याचे मला दिसते. मला एवढेच सांगायचे आहे की आमचा संघ खूप स्पर्धात्मक आहे. या सलग दोन पराभवांवरून मी संघाला वाईट ठरवणार नाही. भारताचे बरेच खेळाडू या टी२० मालिकेत खेळत नाही आहेत, त्यामुळे भारतीय संघ कमकुवत झाला आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही.”

हेही वाचा: Babar Azam: “जल्दी करो दुआ का…”, लंका प्रीमिअर लीगमधील बाबर आझमचा मजेशीर Video व्हायरल

मोहम्मद कैफ पुढे म्हणाला, “बुमराहची अनुपस्थिती हे पराभवाचे मोठे कारण आहे. बुमराह बरा झाला आहे त्यामुळे त्याला अजूनही मॅच फिटनेसची गरज आहे. जर त्याने मॅच फिटनेस परत मिळवला तर टीम इंडियासाठी ही आनंदाची बातमी असेल. जर बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर भारत घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकेल अशी शक्यता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not rohit or virat former indian player mohammad kaif told which player can win the world cup for team india avw
Show comments