Shubman Gill Marriage Rumors : भारतीय क्रिकेटर शुबमन गिल मैदानावरील खेळापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. यातच गेल्या काही महिन्यांपासून शुबमन गिलचे नाव क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याबरोबर जोडण्यात येत आहे. यामुळे सध्या सर्वत्र सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्या नात्याची चर्चा रंगत होत्या. मात्र, आता शुबमन गिलचे नाव सारा नाही तर चक्क एका बॉलीवूड अभिनेत्रीशी जोडले जात आहे. शुबमन गिल लवकरच बॉलीवूड अभिनेत्री रिद्धिमा पंडित हिच्याशी लग्न करणार असल्याची चर्चा रंगतेय. इतकेच नाही, तर त्यांच्या लग्नाची तारीख आणि स्थळ याविषयीदेखील उटलसलट चर्चा रंगताना दिसतायत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडित आणि शुभमन गिल यांच्याबाबत काही दिवसांपासून अनेक बातम्या येत होत्या, बरेच लोक तिचे नाव क्रिकेटर शुबमन गिलसोबत जोडत म्हणत होते की, दोघे लवकरच लग्न करणार आहेत. रिद्धिमा आणि गिल डिसेंबर २०२४ मध्ये लग्न करणार असल्याची बातमी अलीकडेच आली होती. मात्र, आता हे सर्व दावे रिद्धिमा पंडितने फेटाळून लावत यात काही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच तिने डिसेंबर २०२४ मध्ये शुबमन गिलबरोबर लग्न करणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

रिद्धिमा पंडितने केला मोठा खुलासा

टेलिचक्करच्या रिपोर्टनुसार, रिद्धिमाने इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून तिच्या लग्नाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. रिद्धिमाने लिहिले होते की, “मला अनेक पत्रकारांचे खूप फोन येत होते, ज्यामुळे मला जाग आली. सर्व मला माझ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारत होते. पण मी तुम्हाला सांगते की, मी लग्न करणार नाही. माझ्या आयुष्यात असे काही घडले असते तर मी स्वत: ते जाहीर करेन, यावेळी लग्नाच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही.

“शुबमन गिल तुझ्यामुळे आउट होतोय”; चाहतीच्या ‘त्या’ VIDEO तील कृत्यांवर भडकले नेटिझन्स; म्हणाले, “स्वप्न…”

रिद्धिमा अन् शुबमनच्या डेटिंगची चर्चा

गेल्या अनेक दिवसांपासून शुबमन गिल आणि रिद्धिमा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे, पण त्यांना आपले नाते सर्वांपासून लपवून ठेवायचे आहे असे म्हटले जात आहे.

रिद्धिमा पंडित वर्कफ्रंट

रिद्धिमा पंडितच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती ‘बहू हमारी रजनीकांत’, ‘हैवान’ आणि ‘द ड्रामा कंपनी’ यांसारख्या मालिका आणि शोमध्ये दिसली. याशिवाय ती ‘खतरा खतरा’ आणि ‘बिग बॉस ओटीटी’ या टीव्ही शोमध्येही दिसली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not sara tendulkar shubman gill marry to tv actress ridhima pandit to in december 2024 actress breaks silence said if something sjr