फिरकीपटू नॅथन लायनचे ५ बळी आणि त्याला मिचेल स्टार्कच्या प्रभावी माऱ्याची मिळालेली साथ याच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा २७९ धावांनी पराभव केला. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव अवघ्या १३६ धावांत आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-० अशी जिंकली. दमदार कामगिरी करणाऱ्या मार्नस लाबूशेनला सामनावीर आणि मालिकावीर असा दुहेरी सन्मान मिळाला. मात्र लाबूशेनने भारतात भारताविरूद्ध खेळणं सगळ्यात कठीण असल्याची कबुली दिली आहे.

चहलच्या घरी लवकरच वाजणार सनई-चौघडे?

जेव्हा तुम्ही भारतात भारताविरूद्ध खेळता, तेव्हा ती सर्वात कठीण क्रिकेट मालिका असते कारण भारतीय संघ हा खूप आव्हानात्मक खेळ खेळण्यासाठी ओळखला जातो. भारतीय संघात प्रतिभावंत गोलंदाज आणि फलंदाज आहेत. त्यामुळे भारतातील आगामी मालिका आव्हानात्मक असणार यात वादच नाही. पण खेळाडू म्हणून स्वत:ला सिद्ध करायचे असेल तर त्यासाठी तोडीचा प्रतिस्पर्धी संघ आणि प्रतिकूल वातावरण असायला हवे. अशा परिस्थितीतच क्रिकेट खेळण्यासाठी तुम्ही किती पात्र आहात त्याची परीक्षा होते. आणि भारताविरूद्ध भारतात खेळण्यापेक्षा काहीही नाही”, असे मार्नस लाबूशेनने क्रिकेट ऑस्ट्रेलिया वेबसाईटच्या मुलाखतीत सांगितलं.

हा निव्वळ मूर्खपणा – गौतम गंभीर

 

न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत निर्भेळ यश संपादन करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ

 

लाबूशेनने आतापर्यंत केवळ १४ कसोटी सामने खेळले आहेत, पण तो आंतरराष्ट्रीय कसोटी फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानानजीक आहे. त्याची स्पर्धा थेट विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ या दोन अव्वल खेळाडूंशी केली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात लाबूशेनने दमदार द्विशतक ठोकले. त्याच्या या द्विशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पाणी पाजले आणि मालिका ३-० ने खिशात घातली. लाबूशेनला सलामीवीराचा किताब तर मिळालाच पण त्याला प्रथमच मालिकावीराचा किताबदेखील देण्यात आला.