जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत केई निशिकोरीला नमवत अंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम फेरीत त्याचा मुकाबला राफेल नदालला नमवणाऱ्या अँडी मरेशी होणार आहे. उपान्त्य फेरीत जोकोव्हिचने निशिकोरीला ६-३, ७-६ (७-४) असे नमवले.
या स्पर्धेत जोकोव्हिचने अद्याप एकही सेट गमावलेला नाही. जोरदार वाऱ्यांमुळे उपान्त्य फेरीत जोकोव्हिचच्या खेळावर परिणाम झाला. मात्र त्यातून सावरत त्याने सरशी साधली. मरेविरुद्ध जोकोव्हिचची कामगिरी २२-९ आहे. ही कामगिरी सुधारण्यासाठी जोकोव्हिच आतुर आहे. जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मरेला नमवले होते.
नोव्हाक जोकोव्हिच अंतिम फेरीत
या स्पर्धेत जोकोव्हिचने अद्याप एकही सेट गमावलेला नाही.
First published on: 09-05-2016 at 03:39 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Novak djokovic