अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

एएफपी, न्यूयॉर्क

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिच तसेच नाओमी ओसाका यांना पुढील आठवडय़ापासून सुरू होणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी अव्वल मानांकन देण्यात आले आहे.

सर्बियाचा जोकोव्हिच १७व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी उत्सुक असून पुरुषांमध्ये स्पेनच्या राफेल नदालला दुसरे मानांकन मिळाले आहे. २० ग्रँडस्लॅम जेतेपदे आपल्या नावावर करणाऱ्या स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररला तिसरे मानांकन मिळाले आहे. बुधवारी मानांकनाची प्रक्रिया पार पडल्यानंतर गुरुवारी पुरुष आणि महिला गटाचे वेळापत्रक ठरवले जाणार आहे.

महिलांमध्ये जपानच्या ओसाकाने अव्वल मानांकन मिळवले असून गतउपविजेती सेरेना विल्यम्स हिला आठवे मानांकन देण्यात आले आहे. गेल्या वर्षी वादग्रस्त झालेल्या अंतिम फेरीत ओसाकाने सेरेनाचे आव्हान ६-२, ६-४ असे सहज परतवून लावले होते. त्यानंतर ओसाकाने ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले होते. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा जिंकणारी ऑस्ट्रेलियाची अ‍ॅशले बार्टी हिला दुसरे मानांकन मिळाले असून रोमानियाची विम्बल्डन विजेती सिमोना हलेप हिला तिसरे मानांकन देण्यात आले आहे. गतजागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिला तिसरे मानांकन मिळाले आहे.

 

 

Story img Loader