फेडररला सहज नमवले
जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचने एटीपी टूर फायनल्समधील अंतिम सामन्यात सलग चौथ्यांदा विजेतेपद मिळवले. हे विक्रमी विजेतेपद मिळवताना त्याने रॉजर फेडररवर ६-३, ६-४ अशी मात केली.
या स्पर्धेच्या इतिहासात सलग चौथ्यांदा विजेतेपद मिळवणारा तो पहिलाच खेळाडू आहे. या विजेतेपदासह त्याने या स्पर्धेत आतापर्यंत पाच वेळा अजिंक्यपद मिळवले आहे. फेडररने या स्पर्धेत आतापर्यंत सहा वेळा अजिंक्यपद पटकावले आहे. पीट सॅम्प्रस व इव्हान लेंडल यांनी पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. जोकोव्हिचने यंदा ऑस्ट्रेलियन, विम्बल्डन व अमेरिकन खुलया स्पर्धामध्ये अजिंक्यपद पटकावले आहे.
एटीपी स्पर्धेतील फेडररच्या पराभवामुळे अ‍ॅण्डी मरेला जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळणार आहे.

Story img Loader