मेलबर्न :सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने टेनिस कोर्टवर आपली विक्रमी वाटचाल सुरू ठेवताना रॉजर फेडररचा सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामने खेळण्याचा विक्रम मोडीत काढला. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात जोकोविचने पोर्तुगालच्या ग्वामे फारियाचे आव्हान परतवून लावले. ग्रँडस्लॅम कारकीर्दीतील हा त्याचा ४३०वा सामना होता. त्यामुळे त्याने आपला जुना प्रतिस्पर्धी फेडररला (४२९) मागे टाकले.

यंदा आपले २५वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जोकोविचला ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. सातव्या मानांकित जोकोविचने पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या २१ वर्षीय फारियाचा ६-१, ६-७ (४-७), ६-३, ६-२ असा पराभव केला. हा त्याचा ग्रँडस्लॅम कारकीर्दीतील ३७९वा विजय ठरला. त्याने केवळ ५१ सामने गमावले आहेत. त्यामुळे त्याची विजयाची टक्केवारी .८८१ अशी आहे.

Saif Ali Khan attacked by intruder at bandra home
मोठी बातमी! अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, वांद्रेतील घरात मध्यरात्री घडली घटना
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Hindenburg Research winds down
Hindenburg Research : अदाणी समूहाबाबत अहवाल देऊन खळबळ माजवणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चला कुलूप, संस्थापकांनी लिहिली भावूक पोस्ट
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Chhagan Bhujbal plea dispute with BJP for release from ED Mumbai print news
भुजबळ यांच्या दाव्याने नवे वादळ; ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर; ओबीसी असल्याने कारवाई’
Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
IND vs PAK Hong Kong Super 6 Pakistan Beat India by 7 Wickets Robin Uthappa Manoj Tiwary
IND vs PAK: पाकिस्तानने ५ षटकांत भारताचा केला पराभव, एकही विकेट न गमावता गाठले १२० धावांचे लक्ष्य

अल्कराझ, सबालेन्का यांची आगेकूच

पुरुष एकेरीत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या तिसऱ्या मानांकित स्पेनच्या कार्लोस अल्कराझने झटपट विजय मिळवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याने जपानच्या योशिहितो निशिओकाला ६-०, ६-१, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. दुसऱ्या मानांकित जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेवने स्पेनच्या पेड्रो मार्टिनेझचा ६-१, ६-४, ६-१ असा पराभव केला. महिलांमध्ये गतविजेत्या अरिना सबालेन्काने स्पेनच्या जेसिका मानेरोला ६-३, ७-५ असे, तर तिसऱ्या मानांकित कोको गॉफने ज्योडी अॅना बराजला ६-३, ७-५ असेे नमवले.

युकी-ओलिवेट्टी पहिल्याच फेरीत पराभूत

भारताचा युकी भांब्री आणि त्याचा फ्रेंच जोडीदार अल्बानो ओलिवेट्टी यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. पुरुष दुहेरी गटातील सलामीच्या लढतीत युकी-ओलिवेट्टी जोडीला ट्रिस्टन स्कूलकेट आणि अॅडम वॉल्टन जोडीकडून २-६, ६-७ अशी हार पत्करावी लागली.

ग्रँडस्लॅम स्पर्धा या टेनिसच्या आधारस्तंभ आहेत. या अविश्वसनीय स्पर्धांना १३० वर्षांहूनही अधिक मोठा इतिहास आहे. त्यांची अन्य कशाशीही तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे इतके महत्त्व प्राप्त असलेल्या या स्पर्धांत आणखी एक विक्रम रचताना मला खूप आनंद होत आहे. – नोव्हाक जोकोविच

Story img Loader