एपी, लंडन

सर्बियाचा तारांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने आपल्या प्रथितयश कारकीर्दीत आणखी एका विक्रमाची नोंद केली. जोकोविच आता जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला सर्वात वयस्क पुरुष टेनिसपटू ठरला आहे. त्याने रॉजर फेडररचा विक्रम मोडीत काढला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

३६ वर्षे आणि ३२१ दिवस वय असलेला जोकोविच एकूण ४२० आठवडे जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी राहिला आहे. यापूर्वी हा विक्रमही फेडररच्याच नावे होता. फेडररने ३१० आठवडे अग्रस्थान राखले होते. तो अखेरचा जून २०१८ मध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी होता.

जोकोविच आणि फेडरर यांची सर्वकालीन सर्वोत्कृष्ट टेनिसपटूंमध्ये गणना केली जाते. जोकोविचने यापूर्वीही फेडररचे बरेच विक्रम मोडले आहेत. १९६८ सालापासून सुरू झालेल्या खुल्या स्पर्धाच्या युगात सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विक्रम जोकोविचच्या (२४) नावे आहे. फेडररने पीट सॅम्प्रसचा १४ ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विक्रम मोडीत काढला होता. कारकीर्दीच्या अखेरीस फेडररच्या नावे २० ग्रँडस्लॅम जेतेपदे होती. मात्र, त्यानंतर राफेल नदाल (२२) आणि फेडरर (२४) यांनी त्याला मागे टाकले.

हेही वाचा >>>IPL 2024: SRH चे फलंदाज ठरले फेल पण २० वर्षाच्या तरुणतुर्क शिलेदाराने सावरला संघाचा डाव, कोण आहे हा नितीश रेड्डी?

जोकोविच सध्या मॉन्टे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत खेळत आहे. २६ मेपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या तयारीसाठी तो या स्पर्धेत सहभागी झाला आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धेत जोकोविच गतविजेता आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत, ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या विजेत्या यानिक सिन्नेरने आपले दुसरे स्थान राखले. त्या खालोखाल कार्लोस अल्कराझ, डॅनिल मेदवेदेव आणि अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांचा क्रमांक लागतो.

अनुभवाला मेहनतीची जोड..

भारताचा ४२ वर्षीय रोहन बोपण्णा आणि ३६ वर्षीय जोकोविच या अनुक्रमे दुहेरी आणि एकेरीच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या दोन सर्वात वयस्क टेनिसपटूंना मॉन्टे कार्लो स्पर्धेच्या निमित्ताने संवाद साधण्याची संधी मिळाली. याची चित्रफीत ‘एटीपी’ने प्रसिद्ध केली. ‘‘टेनिस तुम्हाला खूप काही शिकवते. अनुभवाला तोड नाही आणि माझ्या गाठीशी खूप अनुभव आहे,’’ असे बोपण्णा म्हणाला. ‘‘अनुभव महत्त्वाचा आहेच, पण त्याच बरोबरीने तुम्ही खेळाकडे किती गांभीर्याने पाहता, किती मेहनत घेता या गोष्टीही खूप महत्त्वाच्या असतात,’’ असे जोकोविचने यावर उत्तर दिले. ‘‘मी बोपण्णाला तासन्तास जिममध्ये मेहनत घेताना पाहिले आहे. आम्ही दोघे एकेरी आणि दुहेरीतील सर्वात वयस्क टेनिसपटू आहोत. हा खूप मोठा मान असल्याचे मी मानतो. ही सर्बियन आणि भारतीय टेनिससाठीही खूप मोठी गोष्ट आहे,’’ असेही जोकोविच म्हणाला.

Story img Loader