अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचा थरार लवकरच सुरू होणार आहे. नोव्हाक जोकोव्हिचला अव्वल, तर रॉजर फेडररला द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. या रचनेमुळे हे दोन श्रेष्ठ खेळाडू थेट अंतिम फेरीतच एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. मात्र नोव्हाक जोकोव्हिच आणि अँडी मरे यांनी अपेक्षित गटवार आगेकूच केल्यास उपांत्यपूर्व फेरीत ते एकमेकांविरुद्ध असतील. मरेला यंदाच्या वर्षी खराब फॉर्म आणि दुखापती यांनी सतावले आहे. यामुळेच स्पर्धेसाठी त्याला आठवे मानांकन देण्यात आले आहे. २०१२मध्ये त्याने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. गेल्या वर्षी विम्बल्डन जेतेपदानंतर मरेच्या कामगिरीत घसरण झाली आहे. वर्षांतील शेवटच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या निमित्ताने जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची मरेला सुवर्णसंधी आहे. जोकोव्हिचच्या आधी मरेला जो विल्फ्रेड त्सोंगासारख्या आक्रमक खेळाडूचे आव्हान मोडीत काढावे लागणार आहे. दुसरीकडे रॉजर फेडररसमोर तुलनेने सोपे आव्हान आहे. गटवार आगेकूच सुरळीत केल्यास उपांत्यपूर्व फेरीत फेडररची लढत ग्रिगोर दिमित्रोव्हशी होऊ शकते.
महिलांमध्ये सेरेना विल्यम्सला अग्रमानांकन देण्यात आले असून, उपांत्यपूर्व फेरीत सेरेनाला अॅना इव्हानोव्हिकचा सामना करावा लागू शकतो. काही दिवसांपूर्वीच झालेल्या सिनसिनाटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत सेरेनाने अॅनावर मात करत जेतेपदाची कमाई केली होती. तृतीय मानांकित पेट्रा क्विटोव्हा आणि सातव्या मानांकित युजेनी बोऊचार्ड यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगण्याची शक्यता आहे. मारिया शारापोव्हा आणि सिमोना हालेप यांच्यातील मुकाबला चुरशीचा होण्याची चिन्हे आहेत.
युकी, सनम पराभूत
न्यूयॉर्क : युकी भांब्री आणि सनम सिंग या भारतीय खेळाडूंना अमेरिक न खुल्या स्पर्धेच्या पात्रता फे रीचा अडसरसुद्धा ओलांडता आला नाही. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील एके री प्रकोरात एक ही भारतीय टेनिसपटू प्रतिनिधित्व क रणार नाही. दुखापतीमुळे पाच महिने कोर्टपासून दूर असणाऱ्या युकीला आर्यलडच्या जेम्स मॅक गीने ५-७, ६-२, ५-७ असे नमवले. जर्मनीच्या आंद्रेस बेक ने सनम सिंगवर ५-७, ७-६(३), ६-३ अशी मात केली. सोमदेव देववर्मन पात्रता फे रीच्या पहिल्याच लढतीत पराभूत झाला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा