कतार खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात नोवाक जोकोव्हिचला जागतिक क्रमवारीत २४ व्या स्थानी असलेल्या रॉबेटरे बॉटिस्टा अगुत याच्याकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

स्पेनच्या रॉबेटरेने वर्षांरंभीच्या पहिल्याच आठवडय़ात धक्कादायक निकालाची नोंद केली. रॉबेटरेने जोकोव्हिचला तीन सेटच्या लढतीत ६-३, ६-७, ६-४ असे नमवले. रॉबेटरेने यापूर्वी एकदा जोकोव्हिचला शांघाय खुल्या टेनिस स्पर्धेत २०१६ साली पराभूत केले होते. रॉबेटरेची अंतिम लढत झेक रिपब्लिकच्या टॉमस बर्डिच याच्याशी होणार आहे.

Story img Loader