जोकोव्हिच पुन्हा एकदा ‘एटीपी वर्ल्ड टूर’चा विजेता
सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेचे अंजिक्यपद पुन्हा एकदा मिळविण्यात यश प्राप्त केले. जोकोव्हिचने अंतिम फेरीत स्पेनच्या राफेल नदाल याचा सहजगत्या पराभव केला.
एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेचा अंतिम सामना एक तास ३६ मिनिटे चालला. यामध्ये जोकोव्हिचने उत्कृष्ट खेळी करत नदालचा ६-३, ६-४ असा पराभव केला. या सामन्यातील विजयासह जोकोव्हिच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
जोकोव्हिच म्हणाला, या वर्षाची अखेर करण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण होते. या शहराला टेनिसचा खूप मोठा इतिहास आहे आणि येथे विजेतेपद मिळाल्याने मी आनंदी आहे.
‘एटीपी वर्ल्ड टूर’वर जोकोव्हिचचे साम्राज्य!
जोकोव्हिच पुन्हा एकदा 'एटीपी वर्ल्ड टूर'चा विजेता सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेचे अंजिक्यपद पुन्हा एकदा मिळविण्यात यश प्राप्त
First published on: 12-11-2013 at 01:38 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Novak djokovic dominates rafael nadal with tour finals masterclass