जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. बोर्ना कोरिकवर ६-२, ६-४ असा विजय मिळवत जोकोव्हिचने बाजी मारली.

२०१३ नंतर जोकोव्हिच माद्रिद स्पर्धेत खेळलेला नाही. चार दुहेरी चुकांनंतर खेळात सुधारणा करत जोकोव्हिचने तिसरी फेरी गाठली. निक कुर्यिगासने स्टॅनिसलॉस वॉवरिन्कावर ७-६ (७), ७-६ (२) अशी मात केली. केई निशिकोरीने फॅबिओ फॉगनिनीला ६-२, ३-६, ७-५ असे नमवले. सॅम क्वेरीने ल्युकास पौइलीचा ६-७ (५), ६-३, ६-४ असा पराभव केला. दरम्यान पाठीच्या दुखापतीच्या कारणास्तव व्हिक्टोरिया अझारेन्काने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

Story img Loader