Novak Djokovic injury video viral : सध्या सर्बियन टेनिस स्टार खेळाडू आणि २४ वेळा ग्रँडस्लॅम विजेता नोव्हाक जोकोविच इटालियन ओपनमध्ये दमदार प्रदर्शन करत आहे. १० मे रोजी झालेल्या सामन्यात जोकोविचने बाजी मारली. यानंतर स्टार खेळाडू चाहत्यांना ऑटोग्राफ देत असताना अपघात झाला, ज्यामध्ये जोकोविचच्या डोक्याला दुखापत झाल्याने जखमी झाला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यानंतर नोव्हाक जोकोविचने आपण ठीक असल्याचे सांगितले आहे.

रोममधील इटालियन ओपन २०२४ मधील दुसऱ्या फेरीतील विजयानंतर जगातील नंबर वन सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचच्या डोक्यावर स्टेनलेस स्टीलची बाटली आदळल्यानंतर, तो खाली कोसळला होता. त्यानंतर त्याला दवाखान्यात अॅडमिट करणात आले होते. तत्पूर्वी जोकोविचने शुक्रवारी सेंटर कोर्टवर फ्रान्सच्या कोरेन्टिन माउटेटचा ६-३, ६-१ असा पराभव करून इटालियन ओपनची तिसरी फेरी गाठली. जोकोविचसाठी हा त्याच्या कारकिर्दीतील १,०९९वा मोठा विजय होता, परंतु सर्बियन टेनिस स्टार कोर्टातून बाहेर पडताना जखमी झाला होता.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह

चाहत्यांना ऑटोग्राफ देताना दुखापत –

जोकोविच चाहत्यांना ऑटोग्राफ देत असताना ही घटना घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ३६ वर्षीय जोकोविचच्या डोक्यावर स्टेनलेस स्टीलच्या पाण्याच्या बाटली पडताना दिसत आहे. यानंतर त्याने लगेचच आपले डोके दोन्ही हातांनी धरले आणि खाली बसला. त्यावेळी सुरक्षारक्षक पाण्याच्या बाटलीच्या मालकाचा शोध घेताना दिसले. यादरम्यान जोकोविचला सामन्यानंतर पत्रकार परिषदही घेता आली नाही. मात्र, जोकोविचने ट्विट करून माहिती दिली.

हेही वाचा – VIDEO : गंभीरच्या मार्गदर्शनाखालील केकेआरच्या कामगिरीने भारावला चाहता, गौतमसमोर बोलताना अश्रू अनावर

ऑटोग्राफ देताना जोकोविचला दुखापत झाल्यानंतर चाहत्यांना त्याची काळजी वाटू लागली. त्यानंतर चाहत्यांनी जोकोविच लवकर बरा व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर जोकोविचने एक्सवर ट्विट करून चाहत्यांना आपल्या प्रकृतीची माहिती दिली आणि त्यांचे आभारही मानले. जोकोविचने ट्विट करताना लिहिले, माझी काळजी केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. हा एक अपघात होता आणि मी आता ठीक आहे. सध्या हॉटेलमध्ये आईस पॅक घेऊन आराम करत आहे.

Story img Loader