लंडनमध्ये नुकत्याच एटीपी वर्ल्ड टूर फायनल्समध्ये रॉजर फेडररला नमवत जेतेपद पटकावणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने वर्षांचा शेवटही संस्मरणीय केला. जोकोव्हिचने सलग दुसऱ्या वर्षी क्रमवारीत अव्वल स्थान राखण्याचा विक्रम नोंदवला. १२,९२० गुणांसह जोकोव्हिच अव्वल स्थानी तर १०,२६५ गुणांसह रॉजर फेडरर दुसऱ्या स्थानी आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता अँडी मरे तिसऱ्या तर राफेल नदाल चौथ्या स्थानावर आहे. यंदाच्या वर्षी जोकोव्हिचला केवळ ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा या एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा करता आला आहे.

Story img Loader