विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळवत सर्बियाच्या नोवाक जोकोव्हिचने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे त्याचे जागतिक मालिकेच्या अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला आहे. विम्बल्डनचा गतविजेता अँडी मरेची मात्र दहाव्या क्रमांकापर्यंत घसरण झाली आहे.
जोकोव्हिचने रॅफेल नदालला मागे टाकून अग्रस्थान घेतले आहे. आतापर्यंत त्याने १०१ आठवडे अग्रस्थान उपभोगले आहे. नदालला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे तर रॉजर फेडरर याने तिसरे स्थान घेतले आहे. विम्बल्डन स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीमुळे मरेची पाचव्या क्रमांकावरून दहाव्या स्थानापर्यंत घसरण झाली आहे.
विम्बल्डनमध्ये उपान्त्य फेरी गाठणाऱ्या ग्रिगोर दिर्वित्रोव्हने प्रथमच पहिल्या दहा क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे. त्याने नवव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. नदाल याच्यावर सनसनाटी विजय मिळविणाऱ्या निक किगरेसने १४४ व्या क्रमांकावरून ७८व्या स्थानावर बढती मिळवली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा