अव्वल मानांकित टेनिसपटू नोवाक जोकोव्हिचने त्याच्याशी सामना निश्चितीसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या प्रसंगाचा जाहीर खुलासा करून टेनिसमधील सामना निश्चितीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण टेनिसमध्ये अगदी मोठ्या पातळीवर फिक्सिंग होत असेल याबाबत शंका असल्याचेही त्याने म्हटले आहे. सामना निश्चितीच्या संपर्काबाबत जोकोव्हिचला विचारणा करण्यात आली असता त्याने धक्कादायक खुलासा केला. जोकोव्हिच म्हणाला, हो, सामना निश्चितीसाठी मझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला होता. थेट माझ्याशी संपर्क साधला गेला नव्हता. माझ्या टीममधील काही व्यक्तींकडे २००० साली रशियात सामन्यात पराभव स्विकारण्यासाठीची विचारणा करण्यात आली होती. पण त्यास मी थेट नकार दिला होता.
मॅचफिक्सिंगचे लोण टेनिसपर्यंत, अग्रमानांकित १६ टेनिसपटूंवर संशय
जोकोव्हिचच्या या खुलास्यानंतर सामना निश्चितीच्या चिखलात टेनिसपटूंचेही हात बरबटले असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘बीबीसी’ आणि ‘बझफिडन्यूज’ या दोन्ही माध्यमसंस्थांनी त्यांच्याकडील पुराव्यांचे आधारे हे टेनिसमध्येही मॅचफिक्सिंग झाल्याचे दावे केले आहेत. या खेळावर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘टेनिस इंटेग्रिटी युनिट’ या विभागाने अग्रमानांकित ५० टेनिसपटूंपैकी १६ जणांवर मॅचफिक्सिंगचे आरोप केले आहेत. मात्र, यामध्ये प्रत्यक्षात आर्थिक व्यवहार झाले की नाहीत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.