राफेल नदालच्या बालेकिल्यात त्याची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सक्षम असलेल्या रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच या शिलेदारांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत चौथ्या फेरीत आगेकूच केली. महिलांमध्ये तृतीय मानांकित पोलंडच्या अॅग्निेझेस्का रडवानस्काला पराभवाला सामोरे जावे लागले.
तब्बल १७ ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असलेल्या रॉजर फेडररला विजयासाठी जोरदार संघर्ष करावा लागला. फेडररने रशियाच्या डिमिट्री तुरसुनोव्हवर ७-५, ६-७ (९), ६-२, ६-४ असा विजय मिळवला. कारकिर्दीतले फ्रेंच खुल्या स्पर्धेचे पहिले जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक नोव्हाक जोकोव्हिचने मारिन चिलीचचा ६-३, २-६, ७-६ (७), ६-४ असा पराभव करत अंतिम सोळात आगेकूच केली.
महिलांमध्ये मारिया शारापोव्हाने अजेर्ंटिनाच्या पौला ओरमेइचाचा ६-०, ६-० असा धुव्वा उडवला. क्रोएशियाच्या बिगरमानांकित अज्ला टॉमलिजानोव्हिकने तृतीय मानांकित अॅग्निेझेस्का रडवानस्कावर ६-४, ६-४ असा विजय मिळवत खळबळजनक विजयाची नोंद केली.
दरम्यान, भारताच्या रोहन बोपण्णाने मिश्र दुहेरीत स्लोव्हाकियाच्या कतरिना स्त्रेबोटनिकच्या साथीने खेळताना आगेकूच केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा