सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित रॅफेल नदाल व गतविजेता अँडी मरे यांना मागे टाकून विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष गटात अग्रमानांकन मिळविले आहे. महिलांमध्ये पाच वेळा विजेती सेरेना विल्यम्स हिला अग्रमानांकन देण्यात आले आहे.  
ऑल इंग्लंड क्लबने २०११ चा विजेता व गतवर्षीचा उपविजेता जोकोवीच याला ग्रासकोर्टवरील कामगिरीच्या आधारे हे स्थान दिले आहे. फ्रेंच विजेता नदाल याला दुसरे तर मरे याला तिसरे मानांकन मिळाले आहे. नदाल याने येथे २००८ व २०१० मध्ये अजिंक्यपद मिळविले होते. गतवर्षी त्याला येथे पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला होता.
या स्पर्धेत सात वेळा विजेतेपद मिळविणारा फेडरर याला चौथे मानांकन मिळाले आहे. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या स्टॅनिस्लास वॉवरिंक याला पाचवे मानांकन देण्यात आले आहे.
महिलांमध्ये सेरेना हिला अव्वल मानांकन मिळाले असून चीनची ली ना हिला दुसरे तर रुमानियाची सिमोना हॅलेप हिला तिसरे मानांकन देण्यात आले आहे. पोलंडची अ‍ॅग्नीझेका राडवानस्का हिने चौथे मानांकन मिळविले आहे. नुकतीच फ्रेंच स्पर्धा जिंकणाऱ्या मारिया शारापोवा हिला पाचवे मानांकन मिळाले आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा