गतविजेती मारिया शारापोव्हा आणि जेलेना जँन्कोव्हिकने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. शारापोव्हाने सतराव्या मानांकित स्लोअन स्टीफन्सचा ६-४, ६-३ असा धुव्वा उडवला. पुढच्या फेरीत शारापोव्हाचा मुकाबला सर्बियाच्या अठराव्या मानांकित जेलेना जँन्कोविकशी होणार आहे.
गेल्यावर्षी अंतिम लढतीत सारा इरानीवर मात करत शारापोव्हाने जेतेपदावर कब्जा केला होता. या विजयासह शारापोव्हाने कारकीर्दीतील ग्रँडस्लॅम विजयांचे वर्तुळ पूर्ण केले होते. यंदाही जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या शारापोव्हाने स्टीफन्सला नमवत जेतेपदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.  

Story img Loader