Novak Djokovic vs Carlos Alcaraz : टेनिसमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेला सर्बियाचा स्टार खेळाडू नोव्हाक जोकोविचने सिनसिनाटी मास्टर्स २०२३ चा किताब जिंकला आहे. त्याने जगात नंबर वन असलेल्या स्पेनच्या कार्लोस अल्काराजला ५-७-७-६, ७-६ अशा फरकाने पराभूत केला. ग्रँड स्लॅमच्या अन्य काही टेनिस टूर्नामेंटमध्ये बेस्ट ऑफ थ्री चा सामना झाला. अशातच जोकोविचने पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केलं आणि पुढचे दोन्ही सेट्स जिंकून सामना खिशात घातला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या विजयासोबतच सर्बियाई खेळाडूने अल्काराजने गेल्या महिन्यात विंम्बल्डन फायनलमध्ये केलेल्या पराभवाचा बदला घेतला. विंम्बल्डन फायनलमध्ये पाच सेटपर्यंत सुरु राहिलेल्या सामन्यात अल्काराजने जोकोविचला १-६,७-६,६-१,३-६,६-४ अशा फरकाने पराभूत केलं होतं. विम्बल्डनमध्ये पराभव झाल्यानंतर जोकेविच रडला होता. तसच सिनसिनाटी मास्टर्समध्ये पराभव झाल्यानंतर वर्ल्ड नंबर वन खेळाडू अल्काराजही रडला.

नक्की वाचा – IND v IRE: रिंकू सिंगचा धमाका! भारताच्या ‘या’ माजी दिग्गज खेळाडूने उधळली स्तुतीसुमने, म्हणाले, “रिंकू हा धोनी,युवराजसारखा…”

जोकोविचने स्वत:ची टी शर्ट फाडली

सिनसिनाटी मास्टर्स २०२३ च्या फायनलला ग्रँडस्लॅम ऑल टाईमशिवाय बेस्ट मॅच बोललं जात आहे. पहिल्या सेटमध्ये अल्काराजने टाय ब्रेकरमध्ये ७-५ ने विजय मिळवला होता. यानंतर जोकोविचने जबरदस्त पुनरागमन करून पुढचे दोन्ही सेटमध्ये ७-६,७-६, गुण मिळवून विजय मिळवला. विजयानंतर जोकोविच टेनिस कोर्टमध्येच झोपला. त्याने अल्काराजला हात मिळवणी करून जल्लोष साजरा करताना स्वत:ची टी शर्ट फाडली.

सर्वात जास्त मास्टर्स टायटल जिंकणारा खेळाडू

नोव्हाक जोकोविचचा हा ३९ वा मास्टर किताब आहे. तो सर्वात जास्त मास्टर टायटल जिंकणारा टेनिस खेळाडू आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर स्पेनचा राफेड नडाल आहे. ज्याने ३६ मास्टर्स टायटल जिंकले आहेत. तिसऱ्या नंबरवर स्वित्झरलँडचा माजी खेळाडू रोजर फेडरर आहे. ज्याने २८ टायटल जिंकण्याची कामगिरी केली आहे. तर १७ टायटल जिंकणारा अमेरिकेचा आंद्रे आगासी चौथ्या स्थानावर आणि 14 टायटल जिंकणारा इंग्लडचा अँडी मरे पाचव्या स्थानावर आहे. तसंच करिअरमध्ये सर्वात जास्त सामने जिंकण्याच्या यादीत जोकोविच तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने प्रोफेशनल टेनिसमध्ये आतापर्यंत एकूण १०६९ सामने जिंकले आहेत. या लिस्टमध्ये जिमी कॉनर्स अव्वल स्थानावर आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये १२७४ सामने जिंकले आहेत. तर रॉजर फेडरर दुसऱ्या स्थानावर असून त्याने 1251 सामने जिंकेल आहेत.