एपी, न्यूयॉर्क

सर्बियाचा २३ ग्रँडस्लॅम विजेता नोव्हाक जोकोविच व अग्रमानांकित स्पेनचा कार्लोस अल्कराझ यांच्यातील द्वंद्व पाहण्याची संधी सोमवारपासून सुरू होणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या माध्यमातून चाहत्यांना मिळणार आहे. विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अल्कराझने जोकोविचचा पराभव करत चुणूक दाखवली होती. त्यामुळे जोकोविच या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा चमकदार कामगिरीच्या प्रयत्नात असेल. दोन्ही खेळाडूंची मानांकने पाहता ते कार्यक्रमपत्रिकेनुसार अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळू शकतात.

Shahid Afriadi breaks silence on relationship rumours with Sonali Bendre
सोनाली बेंद्रेबरोबरच्या अफेअरबद्दल विचारताच पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणाला, “आता आम्ही…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
bmc to rehabilitate fisherwomen in tardeo
मासळी विक्रेत्या महिलांचे पुनर्वसन होणार ? पालिका अधिकाऱ्यांची मासळी विक्रेत्या महिलांसह बैठकीत चर्चा
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
markadwadi women angry
Markadwadi : “मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा पेटला पाहिजे”, शरद पवारांसमोरच महिलांनी एल्गार पुकारला!

जोकोविच हा ३६ वर्षांचा असून अल्कराझ अवघ्या २० वर्षांचा आहे. मात्र, असे असले तरीही सध्याच्या टेनिसमधील ते आघाडीचे पुरुष एकेरी खेळाडू आहेत. दोघेही जेतेपदाचे प्रबळ दावेदार समजले जात आहेत. विम्बल्डनमध्ये जोकोविचला आपले २४ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकण्याची संधी होती. मात्र, अल्कराझकडून त्याला पराभवाचा सामना करावा लागला. करोनाची लस न घेतल्याने जोकोविचला गेल्या स्पर्धेत सहभाग नोंदवता आला नव्हता. त्यामुळे यावेळी जोकोविचच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष राहील. दुसऱ्या मानांकित जोकोविचचा सामना पहिल्या फेरीत फ्रान्सच्या अॅलेक्झांडर म्युलरशी होणार आहे. तर, अल्कराझ जर्मनीच्या डॉमिनिक कोएपफरविरुद्ध स्पर्धेची सुरुवात करेल. यासह २०२१चा विजेता डॅनिल मेदवेदेव, गेल्या वर्षीचा उपविजेता कॅस्पर रूड, होल्गर रून आणि टोरंटो स्पर्धेतील विजेता यानिक सिन्नेर हे खेळाडू आव्हान उपस्थित करू शकतात. राफेल नदाल दुखापतीतून न सावरल्याने स्पर्धेत सहभागी होणार नाही. जोकोविच व अल्कराझ यांनी एकमेकांविरुद्ध खेळलेल्या चार सामन्यांतील प्रत्येकी दोन-दोन सामने जिंकले आहेत.

हेही वाचा >>>World Athletics Championships जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा: भारतीय पुरुष रिले संघाचा आशियाई विक्रम

महिला विभागात सर्वाचे लक्ष पोलंडच्या इगा श्वीऑनटेककडे आहे. श्वीऑनटेकसमोर दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्का, तिसरी मानांकित जेसिका पेगुला, चौथ्या मानांकित एलिना रायबाकिनाचे आव्हान असणार आहे. अमेरिकेची युवा कोको गॉफचा प्रयत्नही चांगल्या कामगिरीचा असेल. गॉफने या महिन्यात वॉशिंग्टन आणि सिनसिनाटी स्पर्धेचे जेतेपद मिळवत चमक दाखवली. स्लोएन स्टीफन्सने २०१७ मध्ये मिळवलेल्या जेतेपदानंतर अजूनही कोणत्याही अमेरिकन खेळाडूला जेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे गॉफ व पेगुलाकडून अमेरिकेला अपेक्षा असतील. विम्बल्डन विजेती मार्केट वांड्रोसोव्हाही या स्पर्धेत सहभागी होणार आहे. टय़ुनिशियाची ओन्स जाबेऊरही चमकदार कामगिरीसाठी सज्ज असेल.

Story img Loader