एटीपी स्पर्धाद्वारे सर्वाधिक कमाई करण्याच्या आंद्रे आगासीच्या विक्रमाची बरोबरी
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने मियामी टेनिस स्पर्धेच्या जेतेपदासह शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. अंतिम लढतीत जोकोव्हिचने जपानच्या केई निशिकोरीवर ६-३, ६-४ असा विजय मिळवला. जेतेपदासह एटीपी स्पर्धाद्वारे सर्वाधिक कमाई करणाऱ्या आंद्रे आगासीच्या विक्रमाची बरोबरी केली. या जेतेपदासह जोकोव्हिचने १० लाख २८ हजार डॉलर्स बक्षीस रकमेची कमाई केली. जोकोव्हिचच्या नावावर एटीपी स्पर्धाद्वारे ९ कोटी, ८१ लाख, ९९ हजार, ५४८ डॉलर्स एवढी रक्कम आहे. फेडररने एटीपी स्पर्धाद्वारे ९ कोटी, ७८ लाख, ५५ हजार ८८१ डॉलर्स कमावले आहेत. एटीपी मास्टर्स स्पर्धेचे जोकोव्हिचचे हे २८वे जेतेपद आहे. जेतेपदासह जोकोव्हिचने कारकीर्दीतील ७१४व्या विजयाची नोंद केली.
‘जेतेपद, बक्षीस रकमेचा विक्रम हे सगळे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. स्पर्धेतील ही माझी सर्वोत्तम कामगिरी होती. अव्वल दर्जाच्या खेळाडूविरुद्ध जिंकणे नेहमीच समाधानकारक असते,’’ अशा शब्दांत जोकोव्हिचने आपल्या भावना व्यक्त केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा