माजी विश्व उपविजेता खेळाडू देवेंद्र जोशी, ध्रुव सितवाला, आशियाई सुवर्णपदक विजेता अशोक शांडिल्य यांच्यासह अनेक नामवंत खेळाडू बिलियर्ड्स प्रीमिअर लीगमध्ये सहभागी झाले आहेत. ही लीग १६ ते २४ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
ही स्पर्धा दहा संघांमध्ये होणार असून सामन्यांचे आयोजन येथील सहा क्लबमध्ये केले जाणार आहे. सहभागी खेळाडूंमध्ये ध्वज धारिया या गुजरातच्या खेळाडूचा अपवाद वगळता अन्य सर्व खेळाडू येथील स्थानिक खेळाडू आहेत. प्रत्येक सामन्यात पाच लढतींचा समावेश असेल.
प्रत्येक संघात सात खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेतील सामने प्रथम साखळी पद्धतीने होणार आहेत. त्यानंतर पहिले चार क्रमांकांचे संघ आयपीएलसारख्या प्लेऑफ पद्धतीने सामने खेळतील.
विजेत्या संघास सव्वा लाख रुपयांचे बक्षीस मिळेल तर उपविजेत्या संघास ९० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकांच्या संघांना अनुक्रमे ६० हजार व ५० हजार रुपयांची कमाई होईल.
आता बिलियर्ड्समध्येही लीग स्पर्धा ; सितवाला, जोशी, शांडिल्य सहभागी
माजी विश्व उपविजेता खेळाडू देवेंद्र जोशी, ध्रुव सितवाला, आशियाई सुवर्णपदक विजेता अशोक शांडिल्य यांच्यासह अनेक नामवंत खेळाडू बिलियर्ड्स प्रीमिअर लीगमध्ये सहभागी झाले आहेत.
First published on: 05-08-2014 at 12:47 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now billiards league competition