युवा खेळाडूंमधील गुणवत्ता हेरून त्यांना ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने सर्वतोपरी मदत करणाऱ्या ‘लक्ष्य’ या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने आता मुंबईकडेही आपला मोर्चा वळवला आहे. पुण्यासह नाशिक, कोल्हापूर, अहमदाबाद, सूरत आणि बडोद्यात शाखा असणारी ‘लक्ष्य’ ही संस्था नेमबाजी, बॉक्सिंग, टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट आणि बुद्धिबळ या खेळातील खेळाडूंना मदत करते.
२०१६मध्ये रिओ डी जानेरो ऑलिम्पिकसाठी आपले १२ खेळाडू पात्र ठरतील, असे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. ‘लक्ष्य’ने पाठिंबा दिलेले पाच खेळाडू लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते. तीन वर्षांपूर्वी स्थापना झालेल्या ‘लक्ष्य’ने आतापर्यंत ५० खेळाडूंना सहकार्य केले असून त्यात राही सरनोबत (नेमबाजी), व्ही. दिजू (बॅडमिंटन), अश्विनी पोनप्पा (बॅडमिंटन), ज्वाला गट्टा (बॅडमिंटन) आणि जय भगवान (बॉक्सिंग) या लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंचा समावेश आहे.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा