Babar Azam in Lanka Premier League 2023: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या सुरु असणाऱ्या लंका प्रीमियर लीगमध्ये कोलंबो स्ट्रायकर्सकडून खेळत आहे. गॅले टायटन्सविरुद्धच्या सामन्यात बाबर आझमने शानदार शतक झळकावले, जे त्याच्या टी२० कारकिर्दीतील १० वे शतक होते. बाबरच्या शतकानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात धावांचा पाठलाग करताना बाबरने हे शतक झळकावले. याच सामन्यात बाबरचे अर्धशतक पूर्ण होताच रमीझ राजाने कॉमेंट्री बॉक्समध्ये फलंदाजाचे कौतुक केले. टिप्पणी करताना तो म्हणाला, “बाबरचा क्लासच वेगळा आहे. संघाच्या बिकट परिस्थितीत तुम्हाला त्याच्यासारख्या खेळाडूची गरज आहे, जो शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून खेळतो. माझे त्याच्यावर प्रेम आहे, आणि मला त्याच्याशी लग्न करायचे आहे.” त्याच्या या वक्तव्याची क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रमीझ राजा यांचे हे विधान इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे की आता चाहते देखील काही समजण्याच्या पलीकडे गेले आहेत. बाबरच्या शतकाबद्दल बोलायचे तर त्याने ५९ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना बाबरने डावातील शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आपली विकेट गमावली. बाबर संघासाठी सलामीला उतरला.

हेही वाचा: BCCI Media Rights: जिओच्या गुगलीवर Disney+ Hotstarची उडाली दाणादाण, IPLमुळे तीन महिन्यात बसला मोठा फटका

बाबरच्या शतकाच्या जोरावर कोलंबो स्ट्रायकर्सने सामना जिंकला

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गॅले टायटन्स संघाने २० षटकांत ३ गडी गमावून १८८ धावा केल्या. संघासाठी यष्टीरक्षक फलंदाज टिम सेफर्टने ३५ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५४ धावांची खेळी केली. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलंबो स्ट्रायकर्स संघाने १९.५ षटकांत ३ विकेट्स राखून लक्ष्य गाठले. आझमच्या ५९ चेंडूत १०४ धावांच्या मॅच-विनिंग खेळीने केवळ त्याच्या संघाला विजय मिळवून दिला नाही तर या शतकासह तो टी२० मध्ये १० शतके करणारा दुसरा खेळाडू ठरला.

हेही वाचा: Word Cup2023: हे काय बोलून गेला रोहित, वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगणार? कर्णधाराला सतावतेय ‘ही’ चिंता

बाबर आझमच्या दमदार कामगिरी बरोबरच पथुम निसांकाने सलामीला खेळताना ४० चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५४ धावा केल्या. बाबर आझम नाबाद राहून संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. कोलंबोकडून मोहम्मद नवाजने विजयी शॉट खेळला. या विजयाने स्ट्रायकर्सना चार सामन्यांतून चार गुण मिळवून प्लेऑफच्या शर्यतीत परत आणले. एलपीएलमधील आझमची कामगिरी टी२० क्रिकेटमधील त्याचे उल्लेखनीय सातत्य दर्शवते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now what did babar azam do that ramiz raja wants to marry him know details as fans trolled them avw
Show comments