न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. यजमान आणि न्यूझीलंड दरम्यान तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आजपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जाणार आहे. आतापर्यंत ही कसोटी मालिका इंग्लंडच्या फलंदाजांनी गाजवली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आपल्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर तो कसोटी क्रिकेटमधील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. दरम्यान, आता जो रूटचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बुधवारी जो रूटने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो एका फलकाजवळ उभा आहे. त्या फलकाजवळ बॅटही उभी केलेली आहे. रूट ज्या फलकाजवळ उभा आहे त्यावर असे लिहिले आहे, ‘मला क्रिकेट आवडत नाही’. या ओळीच्या खाली आणखी एक ओळ लिहिलेली आहे. ‘ते माझं प्रेम आहे'(आय लव्ह इट) अशी ही ओळ आहे. फलकावरची पहिली ओळ बघून क्षणभर रूटचे चाहते देखील विचारात पडले होते.

जो रूटने अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गज मार्नस लॅबुशेनला मागे टाकून कसोटी फलंदाजीच्या आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर रूट भारताविरुद्ध एक कसोटी सामना खेळताना दिसेल.

हेही वाचा – International Olympic Day 2022: …म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस

जो रूटचा सध्याचा फॉर्म भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्याने भारताविरुद्ध आतापर्यंत २४ कसोटी सामने खेळले असून ६०.३३ च्या सरासरीने दोन हजार ३५३ धावा केल्या आहेत. यामध्ये आठ शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी भारताविरुद्धच्या याच मालिकेतील पहिल्या चार सामन्यांमध्ये रूटने ५६४ धावा केल्या होत्या.